अपघातामुळे ठाण्यात वाहतूक कोंडी: एकाच्या धडकेने दुसरा ट्रक उलटला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 03:44 PM2021-06-08T15:44:32+5:302021-06-08T15:46:29+5:30

पाठीमागून आलेल्या ट्रकच्या धडकेने पुढचा ट्रक रस्त्यावर मधोमध उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नितीन कंपनी उड्डाणपुलावर घडली. त्याचवेळी ट्रकमधील आॅईलही रस्त्यावर पसरल्यामुळे ठाण्यातील मुंबई- नाशिक महामार्गावर सकाळीच मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात किशोर (३०) आणि रफीक शेख (२५) हे दोघे जखमी झाले आहे.

Traffic jam in Thane due to accident: Another truck overturned due to one collision | अपघातामुळे ठाण्यात वाहतूक कोंडी: एकाच्या धडकेने दुसरा ट्रक उलटला

दोघेजण गंभीर जखमी

Next
ठळक मुद्दे रस्त्यावर आॅईल सांडले दोघेजण गंभीर जखमी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पाठीमागून आलेल्या ट्रकच्या धडकेने पुढचा ट्रक रस्त्यावर मधोमध उलटल्याची घटना मंगळवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास नितीन कंपनी उड्डाणपुलावर घडली. त्याचवेळी ट्रकमधील आॅईलही रस्त्यावर पसरल्यामुळे ठाण्यातील मुंबई- नाशिक महामार्गावर सकाळीच मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या अपघातात किशोर (३०) आणि रफीक शेख (२५) हे दोघे जखमी झाले असून त्यांना ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज
रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ट्रकचालक किशोर (30) हा रिकामा ट्रक घेऊन ठाण्यातून भिवंडीकडे जात होता. हा ट्रक नितीन कंपनी उड्डाणपुलावरून जात असताना, ठाण्यातून वसईकडे जाण्यासाठी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या रकिक शेख याच्या ट्रकने किशोरच्या ट्रकला धडक दिली. हा अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, किशोरचा ट्रक पुढे जाऊन रस्त्याच्या मधोमध जाऊन उलटला. याचदरम्यान ट्रकमधील आॅईल आणि डिझेल रस्त्यावर पसरले. रस्त्याच्या मधोमध ट्रक उलटल्याने तसेच आईलही पसरल्यामुळे या रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ही माहिती मिळताच ठाणे महापालिका प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दल तसेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही ट्रकचे चालक जखमी झाले होते. भिवंडीतील जखमी चालक किशोरच्या डोक्याला तर नालासोपारा येथील रफिकच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
त्यांना तातडीने ठामपाच्या कळवा येथील
रु ग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर उलटलेला ट्रकही क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आला. रस्त्यावरील आॅईलमुळे वाहने घसरू नये, म्हणून त्याठिकाणी पाण्याचा मारा करुन सफाई करण्यात आली. या दरम्यान मुंबई येथून ठाणे मार्गे नाशिककडे जाणारी वाहतूक एकाच मार्गिकेवरून धीम्या गतीने सुरु ठेवण्यात आली होती. एकाच मार्गिकेवर काही काळ वाहतूक वळविण्यात आल्याने सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ठाण्यात वाहतूक कोंडीचे चित्र निर्माण झाले होते. सकाळी ८.३० वाजेनंतर ही वाहतूक सुरुळीत झाल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.

Web Title: Traffic jam in Thane due to accident: Another truck overturned due to one collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.