शहरातील १५ ठिकाणे पालिकेने केली कंटनमेंट झोन म्हणून जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 03:21 PM2020-04-09T15:21:30+5:302020-04-09T15:22:33+5:30

ठाणे महापालिकेने आता कोरोनावर मात करण्यासाठी ज्या ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, ते शहरातील १५ भाग कंटनमेंट झोन म्हणून घोषीत केले आहे. या भागातील नागरीकांना अत्यावश्यक सेवा पुरविल्या जात आहेत.

Three places in the city have been declared by the Municipality as containment zones | शहरातील १५ ठिकाणे पालिकेने केली कंटनमेंट झोन म्हणून जाहीर

शहरातील १५ ठिकाणे पालिकेने केली कंटनमेंट झोन म्हणून जाहीर

Next

ठाणे : ठाणे शहरात विविध ठिकाणी सध्या कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाझतांना दिसत आहे. कळवा, मुंब्रा मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील दोन प्रभाग समिती वगळल्या तर जवळ जवळ प्रत्येक प्रभाग समितीत कोरोना रुग्ण आढळला आहे. आता पर्यंत शहरात जवळ जवळ २६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता ज्या ज्या भागात हे रुग्ण आढळले आहेत, असे १५ विभाग पालिकेने कंटेनमेंट झोन (बाधीत क्षेत्र ) म्हणून जाहीर केले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये म्हणून पालिकेने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
                      ठाणे शहरामध्ये काजूवाडी, दोस्ती विहार, हॅप्पी व्हॅली मानपाडा, साईबाबानगर कळवा, लोढा पॅराडाइज माजीवडा, रुणवाल गार्डन, धोबीआळी, कौसा अमृतनगर येथील विघ्नहर्ता इमारत, कळवा मनिषानगर, एमजी रोड नौपाडा, वृंदावन सोसायटी आणि विटावा सूर्यानगर ही १५ ठिकाणे कंटनमेंट झोन म्हणून घोषीत करण्यात आले आहेत. या क्षेत्रामध्ये बाहेरील कोणी आतमध्ये जाऊ शकणार नसून आतील माणूस हा बाहेर जाऊ शकणार नाही. परंतु आतमध्ये असलेल्या नागरीकांनासाठी अत्यावश्यक सुविधा पुरविण्याची हमी देखील देण्यात आली आहे. त्यामुळे एकामुळे येथील इतर नागरीकांचे हाल होत असले तरी केवळ सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातून पालिकेने हे पाऊल उचलले आहे. या भागात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत, त्यातही कळव्यात सर्वाधिक म्हणजे १० रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंब्य्रातील अमृत नगर भागात आतापर्यंत ४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एकाचा मृत्यु झाला आहे. तर शहरातील महापालिकेच्या वागळे आणि दिवा प्रभाग समिती वगळता इतर सात प्रभाग समितीमध्ये रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पालिकेने हे पाऊल उचलले असल्याचे सांगितले आहे दिव्यात अद्याप एकही रुग्ण आढळला नसला तरी येथील नागरीकांनी लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच येथील रहिवाशांसाठी देखील घरपोच किराणा आणि इतर सुविधा देण्यासाठी प्रभाग समितीकडून प्रयत्न सुरु आहेत.
या भागातील नागरीकांसाठी इतर सोई सुविधा या पुरविल्या जात आहेत. जेणे करुन येथील नागरीक विनाकारण बाहेर न येता, त्यापासून इतरांना काही बाधा होऊ नये म्हणून देखील हा प्रयत्न पालिकेने केला आहे. नागरीकांनी यासाठी सहकार्य करावे असेही पालिकेने आवाहन केले आहे.

प्रभाग समिती                         कोरोना रुग्ण
१) माजिवडा मानपाडा              ०५
२) वर्तकनगर                            ०१
३) लोकमान्य सावरकरनगर      ०२
४) नौपाडा                               ०३
५)उथळसर                             ०१
६) वागळे                               ००
७) कळवा                             १०
८) मुंब्रा                                 ०४
९) दिवा                                ००
-------------------------------
एकूण                                 २६

 

Web Title: Three places in the city have been declared by the Municipality as containment zones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.