ठाणे जिल्हा परिषद कार्यालय ३१ मार्चपर्यंत बंद; पत्रव्यवहार इ-मेल द्वारे करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 07:42 PM2020-03-18T19:42:33+5:302020-03-18T19:42:49+5:30

ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

Thane Zilla Parishad office closed till March 31; Calling for correspondence by email | ठाणे जिल्हा परिषद कार्यालय ३१ मार्चपर्यंत बंद; पत्रव्यवहार इ-मेल द्वारे करण्याचे आवाहन

ठाणे जिल्हा परिषद कार्यालय ३१ मार्चपर्यंत बंद; पत्रव्यवहार इ-मेल द्वारे करण्याचे आवाहन

Next

ठाणे : राज्य शासनाने कोरोना विषाणु (कोविड -19) या साथ रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७  दि.१३ मार्च २०२० पासुन लागु करुन खंड 2,3 व ४ मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद ठाणे मुख्यालय आणि सर्व पंचायत समिती स्तरावरील सर्व कार्यालयास भेट देणाऱ्या सर्व अभ्यांगताच्या भेटी ३१ मार्च २०२० रोजीपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. या काळात अत्यंत  तातडीचा करावयाचा पत्रव्यव्हार  ( टपाल )  नागरिकांनी ई-मेलव्दारे सबंधित विभागास करावा असे जिल्हा परिषद प्रशासनाने कळविले आहे.

ठाणे जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात योग्य त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. नागरिकांनी कोरोना विषाणु उपाययोजना संबंधी राज्य शासन, जिल्हा परिषद प्रशासन यांच्याकडून वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ठाणे जिल्हा परिषद कार्यालयामध्ये, पंचायत समिती स्तरावर दैनंदिन व वैयक्तीक कामासाठी लोकप्रतिनिधी, नागरीक तसेच अन्य सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, समाजसेवक,ठेकेदार यांची मुख्य कार्यालयात मोठया प्रमाणात वर्दळ होत असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दिनांक ३१ मार्च २०२० पर्यंत जिल्हा परिषद ठाणे मुख्य कार्यालयात / पंचायत समिती स्तरावर प्रवेश बंद करण्यात आला आहे.

परंतू नागरिकांची कोणत्याही स्वरुपात गैरसोय होऊ नये यासाठी पंचायत समितीस्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर नागरीकांना निवेदन/टपाल पोस्टाद्वारे, इमेलद्वारे पत्रव्यवहार करता येईल. किंवा अत्यावश्यक असल्यास पूर्वपरवानगीने दुरध्वनीवरून संपर्क करता येईल. त्यासाठी संबंधित कार्यालयाचे ई-मेल आयडी   व दुरध्वनी zpthane.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच कार्यालयीन दर्शनी भागात प्रसिद्ध करण्यात आले आहेत.  या काळात नागरिकांचे कामे प्रलंबित राहणार नाहीत याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेने केले आहे.

Web Title: Thane Zilla Parishad office closed till March 31; Calling for correspondence by email

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.