ठाणे पोलिसांनी वर्षभरात हस्तगत केले एक कोटी १३ लाखांचे अमली पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 01:31 AM2020-02-18T01:31:16+5:302020-02-18T01:31:41+5:30

७६ तस्करांना अटक : ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई, ‘एलएसडी’ही जप्त

Thane police seized one crore 2 lakh ammunition during the year | ठाणे पोलिसांनी वर्षभरात हस्तगत केले एक कोटी १३ लाखांचे अमली पदार्थ

ठाणे पोलिसांनी वर्षभरात हस्तगत केले एक कोटी १३ लाखांचे अमली पदार्थ

Next

जितेंद्र कालेकर 

ठाणे : ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने जानेवारी ते डिसेंबर २०१९ या वर्षभरामध्ये केटामाइन, एनएसडी पेपर, चरस तसेच मेफेड्रॉन आदी अमली पदार्थांचा एक कोटी १३ लाख ४० हजार २७८ रुपयांचा अमली पदार्थ हस्तगत केला. त्याची तस्करी करणाऱ्या ७६ तस्करांना अटक केली आहे. संपूर्ण आयुक्तालयाच्या विविध पथकांनी मिळून एक कोटी ७६ लाख १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात १९१ गुन्ह्यांमध्ये २८५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचविण्यासाठी ठाणे शहर पोलिसांकडून वर्षभर नियमित कारवाया करण्यात येतात. अनेकदा मध्य प्रदेश, ओरिसा आणि उत्तर प्रदेश येथून मुंब्रा, भिवंडी, अंबरनाथ, कल्याणमधील दुर्गाडी परिसर आणि ठाण्यातील येऊर- उपवन आदी भागांमध्ये अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे आढळले आहे. दोन वर्षांपूर्वी पोखरण रोडवर एमडी पावडरची तस्करी करताना मिळालेल्या दोन तरुणांच्या चौकशीतून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सोलापूरच्या एमआयडीसीत छापा टाकून इफे ड्रीनचा मोठा साठाच हस्तगत केला होता. गेल्या वर्षभरात पोलीस उपायुक्त दीपक देवराज आणि सहायक पोलीस आयुक्त सुनील बाजारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पोवार यांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून २०१९ मध्ये १९ लाख ९२ हजार ३५० रुपयांचा सुमारे ८५ किलो गांजा हस्तगत केला. यात पाच गुन्ह्यांमध्ये सात जणांना अटक केली.
एलएसडी या नवीन अमली पदार्थाची तस्करी करणाºया सात जणांना अटक केली. एका कारवाईमध्ये एकाकडून २३ एलएसडी पेपर आणि ९७० ग्रॅम चरस असा तीन लाख ९५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
दुसºया छाप्यात पाच आरोपींकडून १०६३ एलएसडी पेपर, ५८ ग्रॅम एमडी पावडर आणि ६.४ ग्रॅम चरस असा ६२ लाख ८१ हजार ६४० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. तिघांकडून १२ ग्रॅम एमडी आणि १९ ग्रॅम केटामाइन असा एक लाख ३० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याशिवाय, १४ जणांकडून २१ लाख ५३ हजार ३०८ रुपयांचा गुटखाही या पथकाने जप्त केला.

संपूर्ण आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांनी वर्षभरात १९१ गुन्ह्यांमध्ये

285
आरोपींना
अटक केले. त्यांच्याकडून एक कोटी ७६ लाख १८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

२०१८ मध्ये १७९ जणांना अटक
जानेवारी ते डिसेंबर २०१८ मध्ये पोलीस आयुक्तालयात अमली पदार्थविरोधी कायद्यांतर्गत १०२ गुन्हे दाखल झाले. यात १७९ आरोपींना अटक झाली. त्यांच्याकडून तीन कोटी ३२ लाख ८१ हजार २६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. यात एक कोटी ४५ लाखांच्या पाच किलो स्युडो इफेड्रीन, २० लाख ३० हजारांच्या मेफेड्रॉनचाही समावेश होता.
 

Web Title: Thane police seized one crore 2 lakh ammunition during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.