तोंडाला मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध ठाणे पोलीस करणार कारवाई

By जितेंद्र कालेकर | Published: April 9, 2020 12:15 AM2020-04-09T00:15:28+5:302020-04-09T00:40:04+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी संचारबंदीच्या काळात आधी विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले होते. यापुढे तोंडाला मास्क नसणा-यांवरही गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली.

Thane police action against those who do not mask their mouth | तोंडाला मास्क न लावणाऱ्यांविरुद्ध ठाणे पोलीस करणार कारवाई

मास्क न घातल्यामुळे न्यायालयीन कोठडीही मिळू शकते

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस आयुक्तांनी काढले आदेशठाणे शहर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या परिमंडळांमध्ये होणार गुन्हे दाखल मास्क न घातल्यामुळे अगदी न्यायालयीन कोठडीही मिळू शकते

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मुंबई महानगरपालिकेपाठोपाठ आता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील कार्यक्षेत्रातही तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असल्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी बुधवारी काढले आहेत. या आदेशाचे पालन न करणा-यांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या आदेशात म्हटले आहे.
पोलीस आयुक्त फणसळकर यांनी आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे की, राज्यभरात १३ मार्च २०२० पासून साथरोग अधिनियम १८९७ ची अंमलबजावणी सुरु झाली आहे. कोरोनावर नियंत्रण आणि प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम २०२० नुसार नियमावली तयार केली आहे. मास्क परिधान केल्याने कोरोना विषाणूचा प्रसार कमी होऊ शकतो. त्यामुळे सामाजिक अंतर राखण्याच्या उपायांबरोबरच परस्परांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींच्या बाबतीत मास्क परिधान करणेही महत्वपूर्ण आहे. त्यामुळेच सार्वजनिक ठिकाणी फिरणा-या व्यक्तींनी मास्क परिधान करणे आवश्यक आहे. त्यामुळे ८ एप्रिल २०२० पासून कोणत्याही कारणास्तव रस्ता, रुग्णालय, कार्यालय आणि बाजारपेठ आदी ठिकाणी जाणा-यांनी मास्क परिधान करणे अनिवार्य आहे. वैयक्तिक किंवा शासकीय वाहनातून प्रवास करणा-यांसाठीही हाच नियम लागू राहणार आहे. कार्यालयांमध्ये काम करतांना तसेच कोणत्याही बैठकीच्या वेळी एखाद्या जमावामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी मास्क लावणे बंधनकारक केले आहे. हे आदेश ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळांमध्ये लागू राहणार आहेत.
* कोणत्याही केमिस्टकडे उपलब्ध असलेले सुधारित किंवा घरी बनविलेले (धुण्यायोग्य असे) मास्क धुतल्यानंतर निर्जंतूकीकरण करुन पुन्हा वापरता येऊ शकणारे मास्कही वापरता येतील. या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई झालेल्या आरोपीला शिक्षेचीही तरतूद आहे.

* काय होणार कारवाई
एखाद्याने बाहेर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावरुन जातांना तोंडाला मास्क लावलेला नसल्याचे आढळल्यास त्याला सुरुवातीला भादंवि कलम १८८ नुसार नोटीस बजावली जाणार आहे. त्याला पोलीस ताब्यात घेऊ शकतात. त्यानंतर न्यायालयातून त्याला जामीन घ्यावा लागेल. जर जामीन मिळाला नाहीतर न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यास थेट कारागृहातही जाण्याची वेळ संबंधितांवर बेतू शकते, असेही एका पोलीस अधिका-याने सांगितले.

Web Title: Thane police action against those who do not mask their mouth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.