देखभालीअभावी ठाणे महापालिकेचा ‘आपला दवाखाना’चा प्रयोग फसला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 11:46 PM2020-01-11T23:46:24+5:302020-01-11T23:46:52+5:30

पहिले दोन दवाखाने समस्यांच्या गर्तेत । १६० कोटींची उधळपट्टी कशासाठी?

Thane Municipal Corporation's 'Your Hospital' experiment failed due to lack of maintenance | देखभालीअभावी ठाणे महापालिकेचा ‘आपला दवाखाना’चा प्रयोग फसला

देखभालीअभावी ठाणे महापालिकेचा ‘आपला दवाखाना’चा प्रयोग फसला

googlenewsNext

ठाणे : दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर ठाण्यात आपला दवाखाना ही संकल्पना राबविण्याचा मानस व्यक्त करून सत्ताधाऱ्यांनी १६० कोटींचा प्रस्ताव मंजूरही केला. मात्र, सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या दोन दवाखान्यांची अवस्था अतिशय दयनीय असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कळव्यातील महात्मा फुलेनगर येथील क्लिनिकची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या दवाखान्यात आजघडीला सध्या औषधांचा तुटवडा असून ऑनलाइन कॉलिंग मशीनही मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्थाही नाही.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून ही योजना पुढे आणण्यात आली आहे. त्यानुसार, प्रायोगिक तत्त्वावर असलेल्या या दोन दवाखान्यांचा शुभारंभही त्यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी झाला होता. परंतु, या दवाखान्यांना अवकळा आली आहे. कळवा येथील महात्मा फुलेनगरातील दवाखाना सायंकाळी साडेपाच ते रात्री ९ या वेळेत सुरू असतो. जयभीमनगर, साईबाबानगर, महात्मा फुलेनगर परिसरातील रुग्ण उपचारासाठी येतात. मागील वर्षी मे महिन्यात तोे सुरू झाला. परंतु, अवघ्या काही दिवसांतच त्याची दुरवस्था झाली आहे. या दवाखान्यात डॉक्टरांच्या अनुपस्थितीत रुग्णांना तपासणी करता यावी, याकरिता आॅनलाइन कौन्सिलिंग मशीन बसविली होती. त्या माध्यमातून डॉक्टर जिथे असतील, तेथून रु ग्णांना पाहू शकत होते. परंतु, तेथील स्क्रीनच काढून नेल्याने ती दोन महिन्यांपासून बंद आहे.

बाहेरून औषधे आणावी लागतात
सर्दी, खोकला, ताप, त्वचारोगाचे रु ग्ण उपचारासाठी येतात. महत्त्वाची बाब म्हणजे या रु ग्णांना जी औषधे दिली जातात, त्यांचा साठाच मागील दोन महिन्यांपासून संपला आहे. त्यामुळे येथील डॉक्टर जी उपलब्ध औषधे आहेत, ती देऊन रु ग्णांची बोळवण करीत आहेत.
त्यातही डॉक्टर रु ग्णांना तुम्ही बाहेरून औषध विकत घेऊ शकतात का, अशी विचारणा करून तशी चिठ्ठी देतात. त्यातही एखादा जखमी रु ग्ण आल्यास त्याला ड्रेसिंग करण्याची सोयही नाही. सध्या एक डॉकटर आणि दोन परिचारिका असे कर्मचारी आहेत.
रु ग्णांना तपासण्यासाठी एकाच स्ट्रेचरचा वापर केला जातो. त्यावर साधी गादीही नाही. तर केंद्रातच टाकाऊ सामान एका कोपºयात टाकल्याचे चित्र आहे. यामुळे १६० कोटी खर्च करून ५० आपला दवाखाने सुरू करण्याचा घाट कशासाठी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

Web Title: Thane Municipal Corporation's 'Your Hospital' experiment failed due to lack of maintenance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.