Thane: ठाण्यात मुंबई नाशिक महामार्गावर सांडले चिखल; कोणालाही दुखापत नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 12:37 PM2022-06-28T12:37:44+5:302022-06-28T12:38:10+5:30

Thane: मुंबई-नाशिक महामार्गावर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या अनोळखी ट्रक मधून चिखल विवियाना मॉलच्या समोरील रस्त्यावर पडल्याची घटना मंगळवारी पहाटे ३ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली.

Thane: Mud spilled on Mumbai-Nashik highway in Thane; No one is hurt | Thane: ठाण्यात मुंबई नाशिक महामार्गावर सांडले चिखल; कोणालाही दुखापत नाही

Thane: ठाण्यात मुंबई नाशिक महामार्गावर सांडले चिखल; कोणालाही दुखापत नाही

googlenewsNext

 ठाणे  - मुंबई-नाशिक महामार्गावर मुंबईकडून नाशिककडे जाणाऱ्या अनोळखी ट्रक मधून चिखल विवियाना मॉलच्या समोरील रस्त्यावर पडल्याची घटना मंगळवारी पहाटे ३ वाजून ३५ मिनिटांच्या सुमारास घडली. तो चिखल तातडीने बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. साधारणपणे तासाभरात चिखल बाजूला करण्यासाठी लागल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षेकडून सांगण्यात आले. 
 मुंबई नाशिक महामार्गावरील रस्त्यावर चिखल पडल्याची माहिती मिळताच, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी कापूरबावडी पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी धाव घेतली. तसेच रोडवरती पडलेला चिखल आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचाऱ्यांनी बाजूला करून, मुंबई-नाशिक महामार्ग वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा केला आहे. सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी नाही, किंवा कोणालाही दुखापत झालेली नसल्याचेही कक्षेकडून सांगण्यात आले.
 

Web Title: Thane: Mud spilled on Mumbai-Nashik highway in Thane; No one is hurt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.