ठाणे एफडीएमध्ये दलालांचा सुळसुळाट आमदारांचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 04:28 PM2019-08-13T16:28:48+5:302019-08-13T16:30:28+5:30

ठाण्यातील महागिरी, मुंब्रा, भिवंडी व इतर काही भागात गुटख्याची विक्री सर्रासपणे होत असून काही अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच हा धंदा फोफावला आहे.

Thane FDA accuses MLAs of tampering with brokers | ठाणे एफडीएमध्ये दलालांचा सुळसुळाट आमदारांचा आरोप 

ठाणे एफडीएमध्ये दलालांचा सुळसुळाट आमदारांचा आरोप 

Next

ठाणे :  वागळे इस्टेट येथील अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कार्यालयात दलालांचा सुळसुळाट झाला असून त्यांना पाठबळ देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून अनधिकृतपणे चालणाऱ्या गुटखा विक्रीस आळा घालावा अशी ठोस मागणी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी राज्याचे अन्न व औषध विभागाचे मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे. 

ठाण्यातील महागिरी, मुंब्रा, भिवंडी व इतर काही भागात गुटख्याची विक्री सर्रासपणे होत असून काही अधिकाऱ्यांच्या वरदहस्तामुळेच हा धंदा फोफावला आहे. यापूर्वी त्याबद्दलची सविस्तर माहिती संबंधित सह आयुक्त शिवाजी देसाई यांना देऊनही त्याबद्दल उपाय योजनेबाबत काहीही न कळविणे हि बाब अत्यंत गंभीर व खेदजनक असल्याचे संजय केळकर यांनी मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

पोलिसांनी जप्त केलेला गुटखा ज्या गोदामात ठेवला जातो. त्या गुटख्याला मध्यरात्री काळोखात पाय फुटून तो बाजारात विक्रीसाठी कसा जातो असा सवाल करत या लबाडीची चौकशी करावी. तसेच गुटख्याची विक्री करणाऱ्या आरोपीस पकडले तर त्यांना सोडविण्यासाठी कोण दलाल मध्यस्थी करतात यावर नजर ठेवावी म्हणजे कुंपणच शेत खात असल्याचा अनुभव येईल असे आ. केळकर यांनी मंत्र्यांच्या भेटीत त्यांना सांगितले. 

अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांचे सदर प्रकरणाकडे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्यामुळेच दलालांचे फावले आहे. अधिकाऱ्यांवर कडक करवाई करून दलालांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी मागणी संजय केळकर यांनी मंत्री यांच्याकडे करून आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घातले तर थातुर मातुर कारवाई बंद होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

Web Title: Thane FDA accuses MLAs of tampering with brokers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.