Thane Dr. Bedekar Vidya Mandir School's science project, chaunawadi, internationally selected | ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्या मंदिर शाळेतील विज्ञान प्रकल्पाची चायनावारी, आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड
ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्या मंदिर शाळेतील विज्ञान प्रकल्पाची चायनावारी, आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड

ठळक मुद्देडॉ. बेडेकर विद्या मंदिर शाळेतील विज्ञान प्रकल्पाची चायनावारीप्रकल्पाची आंतरराष्ट्रीय स्तरावर निवडप्रज्ञा मोरे व सेजल रांगळे या विद्याथीर्नींनी या विषयाचा संशोधनात्मक केला अभ्यास

ठाणे : चायना मकाऊ येथे होणाऱ्या ३४ व्या ‘किशोरवयीन विज्ञान व तंत्रज्ञान नवपरिवर्तन’ या आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाºया विज्ञान स्पर्धेसाठी ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्यामंदिर या शाळेच्या विज्ञान प्रकल्पाची निवड झाली आहे. ‘अ‍ॅनेमिया आजारावर नियंत्रण’ हा या प्रकल्पाचा विषय असून २१ जुलै ते २६ जुलै दरम्यान ही स्पर्धा होणार आहे. 
      प्रज्ञा मोरे व सेजल रांगळे या विद्याथीर्नींनी या विषयाचा संशोधनात्मक अभ्यास केला आहे. या प्रकल्पास शिक्षीका उज्ज्वला धोत्रे व अभिजीत जाधव यांचे मार्गदर्शन लाभले आहे. शुक्रवार १९ जुलै रोजी रात्री ११ वाजता शिक्षिका धोत्रे व विद्यार्थीनी प्रज्ञा हे चायनाला रवाना होत आहे. या विद्याथीर्नींनी केलेल्या अभ्यासात असे आढळले की, भारतात तसेच, संपूर्ण जगात लहान मुले, स्त्रिया, गरोदर स्त्रिया यांच्यात अ‍ॅनिमियाचे प्रमाण जास्त असते. त्यावर गोळ््या, कॅप्सुल्स, इंजेक्शन या स्वरुपात औषधे उपलब्ध आहेत. तसेच, काही अन्नघटकातूनसुद्धा लोह शरिरास पुरवले जाते. परंतू काही अन्न - पदार्थांची अ‍ॅलर्जी, खर्चिक बाब यांमुळे लोक दुर्लक्ष करतात व अ‍ॅनिमियाचे प्रमाण वाढते. विद्याथीर्नींच्या संशोधनातून अशी माहिती मिळाली की, स्पिरुलीना अ‍ॅलजीमध्ये लोह व प्रथिनांची मात्र जास्त प्रमाणात आहे. परंतू रंग, वास, चव यांमुळे ती प्रत्यक्ष खाल्ली जात नाही म्हणून विद्याथीर्नींनी सर्व वयोगटाला आवडेल असे स्पीरुलीना मिश्रीत चॉक्लेट्स तयार केले. त्याची तपासणी एन्व्हायरोकेअर लॅबमध्ये केली असता लोह व इतर पोषक मूल्याचे प्रमाण अधिक आढळले असे शाळेच्यावतीने सांगण्यात आले. भारताचे प्रतिनिधीत्व आंतरराष्ट्रीय स्तरावर करणाºया दोन विज्ञान प्रकल्पांमध्ये आमच्या मराठी माध्यमाच्या एका विज्ञान प्रकल्पाचा सहभाग आहे. याचा मुख्याध्यापक म्हणून मला अभिमान आहे अशा भावना शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पांचाळ यांनी व्यक्त केल्या. 


Web Title:  Thane Dr. Bedekar Vidya Mandir School's science project, chaunawadi, internationally selected
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.