Thane Corona Updates: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १३१४ रुग्णांची वाढ; ४९ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2021 09:14 PM2021-05-16T21:14:48+5:302021-05-16T21:15:18+5:30

ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार ३१४ रुग्णांची वाढ रविवार झाली असून ४९ जण दगावले आहेत.

Thane Corona Updates An increase of 1314 corona patients in Thane district 49 killed | Thane Corona Updates: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १३१४ रुग्णांची वाढ; ४९ जणांचा मृत्यू 

Thane Corona Updates: ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १३१४ रुग्णांची वाढ; ४९ जणांचा मृत्यू 

Next

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे एक हजार ३१४ रुग्णांची वाढ रविवार झाली असून ४९ जण दगावले आहेत. आतापर्यंत आज जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या पाच लाख ८२५ आज झाली असून आठ हजार ४७६ मृतांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज रुग्णांसह मृतांची संख्याही घटल्याचे समाधान वैद्यकीय क्षेत्रात आहे.

         ठाणे शहरात २७४ रुग्ण आज सापडल्याने या शहरातील आतापर्यंत एकूण रुग्ण संख्या एक लाख २६ हजार ४५४ रुग्ण नोंदले आहेत. सहा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या एक हजार ८०४ झाली आहे. कल्याण - डोंबिवलीला ४०४ रुग्ण आढळून आले असून २० मृत्यू झाले आहेत. या शहरात आता एक लाख २९ हजार ८१५ बाधीत असून एक हजार ६८२ मृतांची नोंद करण्यात आली आहे.

        उल्हासनगरला ३५ रुग्ण आढळले असून एक मृत्यू झाला आहे. या शहरात १९ हजार ८५ बाधीतांसह मृत्यू संख्या ४५८ नोंद झाली आहे. भिवंडीला ११ रुग्ण सापडले असून दोन मृत्यू आहेत. येथे १० हजार २२३ बाधितांची तर, ४१९ मृतांची नोंद केली. मीरा भाईंदरला ११३ रुग्ण सापडले असून आठ मृत्यू झाले आहे. या शहरात आता ४७ हजार १७८ बाधितांसह एक हजार १८९ मृतांची संख्या आहे. 
 

Web Title: Thane Corona Updates An increase of 1314 corona patients in Thane district 49 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.