विद्यार्थ्यांच्या रेकॉर्डब्रेक गर्दीत रंगली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महापौर चषक चित्रकला स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 02:03 PM2020-01-23T14:03:55+5:302020-01-23T14:04:05+5:30

सकाळी साडेसात वाजल्यापासून विविध शाळांतील विद्यार्थ्यांची दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे झालेली रेकॉर्डब्रेक गर्दी..,

The students' recordbreak rang in the crowd | विद्यार्थ्यांच्या रेकॉर्डब्रेक गर्दीत रंगली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महापौर चषक चित्रकला स्पर्धा

विद्यार्थ्यांच्या रेकॉर्डब्रेक गर्दीत रंगली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महापौर चषक चित्रकला स्पर्धा

Next

ठाणे : सकाळी साडेसात वाजल्यापासून विविध शाळांतील विद्यार्थ्यांची दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे झालेली रेकॉर्डब्रेक गर्दी.., संपूर्ण गॅलरी विद्यार्थ्यांनी तुडुंब भरलेली... निमित्त होते ठाणे महापालिका आयोजित हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महापौर चषक चित्रकला स्पर्धेचे... ही गर्दी पाहून राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथजी  शिंदे हे देखील भारावले आणि चक्क त्यांनी हातात कॅनव्हास घेऊन विद्यार्थ्यांसमवेत बसून चित्र रंगविले.

विद्यार्थ्यांच्या गर्दींचा उच्चांक पाहून त्यांनी स्पर्धेचे अध्यक्ष महापौर नरेश म्हस्के यांनी केलेल्या नियोजनाचे कौतुक करीत सर्व पदा‍धिकारी, शिक्षण अधिकारी, शाळांचे  गटअधिकारी, शिक्षक यांचे आभार मानले.‍ तसेच मुलांच्या उत्साहाला प्रोत्साहन मिळावे यासाठी सर्व सहभागी मुलांना सहभाग प्रमाणपत्र देण्याची घोषणाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली. प्रसिद्ध व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून ठाणे कला क्रीडा महोत्सवांतर्गत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महापौर चषक चित्रकला स्पर्धेचे आज आयोजन महापौर नरेश म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.

यावेळी खासदार राजन विचारे, आमदार रविंद्र फाटक, उपमहापौर पल्लवी कदम, स्थायी  समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते अशोक वैती, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती अमर पाटील, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे, नम्रता कोळी, नगरसेवक दशरथ पालांडे, मिलिंद पाटणकर, उपायुक्त संदीप माळवी, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे,‍ शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, गट अधिकारी संगीता बामणे आदी उपस्थित होते. दरवर्षी शिवसेनाप्रमुखाच्या जयंतीनिमित्त 23 जानेवारीला चित्रकला स्पर्धा घेण्यात येते.‍ ‍

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राजकारणी  होते, परंतु ते एक जागतिक कीर्तीचे व्यंग ‍चित्रकार देखील होते. त्यांची कला नव्या पिढीला माहीत व्हावी  व कलेला प्रोत्साहन मिळावे हा या मागचा ठाणे महापालिकेचा हेतू असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी नमूद केले.  या स्पर्धेत जास्तीत जास्त  ‍विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे यासाठी सर्व महापालिका शाळा व खासगी शाळांतील शिक्षकांच्या बैठका महापौर नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली उपमहापौर पल्लवी कदम, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, क्रीडा व सांसकृतिक समिती सभापती अमर पाटील, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांनी घेतल्या. तसेच लांब असलेल्या शाळांमधील मुले देखील या स्पर्धेला यावीत यासाठी परिवहन सेवेच्या बसेस उपलब्ध करून दिल्या. ‍शिक्षकांनी देखील महापौरांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जास्तीत जास्त विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी केले याबद्दल सर्व शिक्षकांचे महापौर नरेश म्हस्के यांनी आभार व्यक्त केले. व्यंगचित्रकार योगेश पंडित यांनी  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा या स्पर्धेसाठी आशिर्वाद आहे या आशयाचेचित्र साकारले होते, या चित्राचे अनावरण मान्यवरांनी केले व त्यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला.

तीन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. गटासाठी मी व 'माझी आजी/ आजोबा नाना- नानी पार्कमध्ये', 'आम्ही किल्ला बनवितो',  'माझ्या स्वप्नातील ठाणे', 'माझ्या परिसरातील उद्यान' हे विषय देण्यात आले होते. 8 वी ते 10 वीच्या गटासाठी 'आम्ही समुद्रकिनारी फिरायला जातो', 'माझा ठाणे परिवहन बसमधील प्रवास', 'ठाण्यातील ऐतिहासिक वास्तू', 'मेट्रो प्रकल्प' हे विषय तर महाविद्यालयीन गटासाठी 'महाराष्ट्रातील गडकिल्ले', मोबाईलचे दुष्‍परिणाम', 'महिलांचे स्वसंरक्षण काळाची गरज', 'मेट्रो प्रकल्प' हे विषय देण्यात आले होते.

तिन्ही गटांसाठी प्रथम, दवितीय, तृतीय व दोन उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. अनुक्रमे 15 हजार, 12 हजार व 10 हजार व दोन उत्तेजनार्थ 8 हजार अशी रोख रकमेची  पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेचा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असून प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतलेल्या ‍शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ, गट अधिकारी संगीता बामणे, कुंगले सर यांना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राजेंद्र पाटणकर यांनी केले.

Web Title: The students' recordbreak rang in the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.