महाविकास आघाडीने घातलेल्या घोळाचे ठाण्यात जोरदार हादरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 01:56 AM2020-02-21T01:56:11+5:302020-02-21T01:56:24+5:30

आयुक्तांचे दबावतंत्र : कमी महत्त्वाच्या बदलीस विरोध

Strong shakes in Thane of Mahanik Development Alliance | महाविकास आघाडीने घातलेल्या घोळाचे ठाण्यात जोरदार हादरे

महाविकास आघाडीने घातलेल्या घोळाचे ठाण्यात जोरदार हादरे

Next

ठाणे : राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील तीन पक्षांच्या ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ कार्यशैलीमुळे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोळ सुरू असून त्याचे हादरे आता ठाणे महापालिकेत बसू लागले आहेत. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महापालिकेत केलेल्या बदल्या, त्या रद्द करण्याचा निर्णय हे सर्व अन्यत्र चांगल्या पदावर बदली मिळवण्याच्या दबावतंत्राचा भाग आहे की, कमी महत्त्वाच्या पदावरील बदलीची कुणकुण लागल्याने व्यक्त केलेली नाराजी आहे, याची चर्चा मंत्रालयात रंगली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सूत्रे स्वीकारल्यावर दीर्घ काळानंतर वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू केले. मात्र, घाऊक बदल्या न करता मोजक्या बदल्या ते करीत आहेत. याचे कारण राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या दोन मित्रपक्षांचा बदल्यांमध्ये हस्तक्षेप व दबाव आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मागील भाजप सरकारमधील मंत्र्यांच्या निकटवर्तीय अधिकाºयांना मुख्य जबाबदाºया द्यायच्या नाहीत, तर काँग्रेसच्या काही मंत्र्यांना त्यांच्या मर्जीतील अधिकारी हवे आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका आयुक्तपदाकरिता जवळपास नक्की झालेले नितीन करीर यांचे नाव अचानक रद्द झाले व त्यांना महसूल खात्याची जबाबदारी दिली जाणार आहे. साहजिकच, प्रवीण परदेशी यांना तूर्त मुंबई महापालिकेतून हलवले जाणार नाही.
जयस्वाल हे म्हाडा, गृहनिर्माण अथवा झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यापैकी एका विभागात जाण्यास उत्सुक आहेत. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकरिता अनुकूल आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री पवार यांच्या मनात जयस्वाल हे मागील सत्ताधाºयांच्या जवळचे असल्याची अढी असल्याचे बोलले जाते.
समजा, राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादविवादामुळे वरील विभागात बदली होत नसेल, तर शिवसेनेने हस्तक्षेप करून हा तिढा सोडवावा, अशी जयस्वाल यांची अपेक्षा असल्याचे समजते. मात्र, तसे होताना दिसत नसल्याने जयस्वाल यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीय अधिकाºयांच्या घाऊक बदल्या केल्या. लागलीच त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. या नाराजीची दखल सरकारने घ्यावी, हा तर जयस्वाल यांचा हेतू नाही ना, अशी चर्चा यानिमित्ताने पालिका वर्तुळात सुरू आहे.
समजा, मनाजोगे खाते मिळत नसेल व तुलनेने कमी महत्त्वाच्या विभागात बदली होत असल्याची कुणकुण लागली असेल, तर त्याबाबत नाराजी प्रकट करणे, हाही यामागील हेतू असू शकतो, असे मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाºयांच्या वर्तुळात बोलले जाते.

सत्तासंघर्षाचा परिपाक
मागील सरकारमध्ये बाजूला ठेवलेल्या व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांशी उत्तम संबंध असलेल्या काही वरिष्ठ सनदी अधिकाºयांना भाजप सरकारमधील काही प्रभावशाली अधिकाºयांनी मंत्रालयात महत्त्वाच्या पदांवर येऊ नये, असे वाटते. अधिकाºयांमधील रस्सीखेच आणि एकूणच सत्तासंघर्ष याचाही हा परिपाक असल्याचे बोलले जाते.
 

 

Web Title: Strong shakes in Thane of Mahanik Development Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.