ठाण्यात 2 ते 12 जुलैपर्यत कडकडीत बंद; दोन दिवसाच्या गोंधळानंतर अखेर पालिकेने काढला अध्यादेश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 06:49 PM2020-06-30T18:49:38+5:302020-06-30T18:56:36+5:30

महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आध्यादेश काढत संपूर्ण ठाणे शहर लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

Strictly closed in Thane from 2nd to 12th July | ठाण्यात 2 ते 12 जुलैपर्यत कडकडीत बंद; दोन दिवसाच्या गोंधळानंतर अखेर पालिकेने काढला अध्यादेश

ठाण्यात 2 ते 12 जुलैपर्यत कडकडीत बंद; दोन दिवसाच्या गोंधळानंतर अखेर पालिकेने काढला अध्यादेश

Next

ठाणे: शहरात कोरोना बाधीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरात संपूर्ण लॉकडाऊन घ्यायचा की नाही, यावरुन मागील दोन दिवस पालिका आणि पोलीस प्रशासन यांच्यात गोंधळ सुरु होता. 

अखेर मंगळवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आध्यादेश काढत संपूर्ण ठाणे शहर लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 2 जुलैच्या सकाळी 7 ते 12  जुलै सकाळी 7 वाजेर्पयत  वाजेर्पयत संपूर्ण ठाणो शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय महापालिकेने निर्णय घेतला होता. तसेच शहरातील सर्व हॉटस्पॉटमध्ये कडक निबंर्ध घालण्यात आले आहेत. या कालावधीत शहरात केवळ मेडीकल, डॉक्टरांचे दवाखाने आणि दुध विक्रीचीच दुकाने सुरु राहणार असून उर्वरीत सर्वच व्यवहार बंद राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले. 

तसेच बसेस मागील काही दिवसापासून ठाणो शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. आजच्या घडीला शहरात 8 हजाराहून अधिक कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. तर 290 हून नागरीकांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. अनलॉक जाहीर झाल्यापासून शहरात कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. तसेच शहरात नवनवीन हॉटस्पॉटही तयार झाले आहेत. झोपडपटटी पाठोपाठ अनेक सोसायटींमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. बाळकुम, कोलशेत, मानपाडा, नौपाडा, कोपरी, वर्तकनगर आदीसह इतर भागात कोरोनाचे रुग्ण वाढतांना दिसत आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा लॉकडाऊनची वेळ येणार हे निश्चित मानले जात होते. 

परंतु सुरवातीला ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ते भाग शोधून ते भाग हॉटस्पॉट म्हणून घोषीत करुन त्या भागांमध्येच बंद करण्याची चर्चा मागील दोन दिवस सुरु होती. तर सोमवारी दुपारी र्पयत पालिका आणि पोलीस यांच्यात चर्चा होऊन लॉकडाऊन घोषीत करण्याचे निश्चित झाले होते. त्यानुसार आध्यादेशही काढण्यात आला होता. परंतु अचानक रात्री उशिरा हा लॉकडाऊन बाबत गोंधळाचे वातावरण दिसून आले. त्यानंतर मंगळवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आयुक्तांना दिलेल्या अधिकारात नवा आध्यादेश काढून संपूर्ण ठाणे  शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, मंगळवारी पुन्हा महापालिका आयुक्त विपिन शर्मा आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यात चर्चा होऊन या लॉकडाऊनवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानुसार 2 जुलैच्या सकाळी 7 ते 12 जुलै सकाळी 7 या कालावधीत संपूर्ण ठाणो शहर बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यासंदर्भातील अध्यादेशही काढण्यात आला आहे.

काय काय बंद राहणार

या कालावधीत शहरातील अंतर्गत रस्ते बंद राहणार असून, प्रत्येक महत्वाच्या स्पॉटवर पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. याशिवाय शहरातील किराणा मालाची दुकाने, इतर साहित्याची दुकाने, भाजी मार्केट हे सर्व देखील या कालावधीत बंद राहणार आहेत. मॉर्निग वॉक आणि इव्हनींग वॉक हे देखील बंद असणार आहेत. शिवाय कोणालाही विनाकारण घरा बाहेर पडता येणार नाही. अत्यावश्यक आणि  नाशवंत वस्तुच्या ने आण करण्याशिवाय इतर सर्व कारणांकरीता ठाणो महापालिका हददीत लॉकडाऊन असणार आहे. इंटरसिटी, एसएसआयटीसी बसेस आणि मेट्रोसह सर्व सार्वजनिक परिवहन सेवांना परवानगी असणार नाही, टॅक्सी, ऑटो हे सुध्दा बंद असणार आहे.

 सर्व आंतराज्यीय बस आणि प्रवासी वाहतुक सेवांचे (खाजगी वाहनासह) तसेच खाजगी ऑपरेटरांकडून, कामकाज बंद असणार आहे, ज्या प्रत्येक व्यक्तीला घरात वेगळे ठेवणो आवश्यक आहे, त्यांनी त्याचे सक्त पालन केले पाहिजे, अन्यथा कठोर दंडात्मक कारवाई करुन त्याला महापालिकेच्या क्वॉरन्टाइंन सेंटरमध्ये ठेवले जाईल असेही पालिकेने स्पष्ट केले. नागरीक देखील परवानगी असलेल्या कामांसाठीच बाहेर येतील असेही स्पष्ट करण्यात आले आहे, सार्वजनिक ठिकाणी अत्यावश्यक बाबींच्या खरेदीसाठी 5 हून जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास प्रतिंबध, व्यावसायिक आस्थापना कार्यालये, कारखाने, कार्यशाळा, गोदाम, आदींसह सर्व दुकाने त्यांचे कामकाज बंद ठेवतील, सरकारी कार्यालये या कालावधीत कमीत कमी कर्मचा:यांसह ऑपरेट करण्याची परवानगी असेल आणि ते चेक काऊंटरजवळ एकमेकांपासून 3 फुट अंतर ठेवणे अशा सामाजिक अंतराची खात्री करण्यासाठी पावले उचलतील.

काय काय सुरु राहणार

या 10 दिवसांच्या बंदच्या काळात केवळ दुध विक्रीची दुकाने, मेडीकल आणि डॉक्टरांचे दवाखाने सुरु राहणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचा:यांनाच या कालावधीत ये जा करण्याची मुबा असणार आहे, बॅंका,एटीएम, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, आयटी आणि आयटीईणस, टेलीकॉम, टपाल, इंटरनेट, आणि डेटासेवा, पुरवठा साळखी व जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक व उपलब्धता, कृषी वस्तु आणि उत्पादने आणि सर्व वस्तुंची निर्यात आणि आयात, अन्न, फार्मास्युटीक्लस आणि वैद्यकीय उपकरणो यासह आवश्यक वस्तुंचे ई कॉर्मर्स, पाळीव प्राण्यांसाठी बेकरी आणि पशुवैद्यकीय आस्थापने, रुग्णालये, फॉर्मसी आणि ऑप्टीकलस्टोअर्स, फार्मास्युटीकल आणि त्यांचे व्यापारी आणि त्यांची वाहतुक, पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, तेल एजेन्सी त्यांची गोदामे आणि त्यांची संबधींत वाहतुक कार्ये केवळ अत्यावश्यक पास धारकांसाठीच, सर्व सुरक्षा आणि सुविधा व्यवस्थापन सेवा, अत्यावश्यक सेवा पुरविणा:या संस्थांना पुरविल्या जातात अशा, खाजगी आस्थापना, ज्या आवश्यक सेवांच्या सहाय्यकारी सेवा किंवा कोवीड 19 च्या नियंत्रणासाठी सहाय्य करण्या सेवा, मध्यविक्रीची दुकाने केवळ होम डिलीव्हरी सुरु राहणार, लग्न कार्यक्रमासाठी व्यक्तींना परवानगी असणार आहे. एकूणच जे या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Strictly closed in Thane from 2nd to 12th July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.