जादा भाडे आकारणाऱ्या खासगी वाहनांवर होणार कडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 10:09 PM2021-11-10T22:09:00+5:302021-11-10T22:28:56+5:30

एसटी कर्मचाऱ्यांचा संप बुधवारीही सुरूच असताना अनेक ठिकाणी खासगी वाहतूक चालकांनी मनमानी भाडे आकारले. प्रवाशांची सोय करताना कोणी जर मनमानी भाडे आकारत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वायू वेग पथकेही तयार केली असून, विशेष नियंत्रण कक्षाचीही निर्मिती केल्याची माहिती ठाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी बुधवारी दिली.

Strict action will be taken against private vehicles charging extra fare | जादा भाडे आकारणाऱ्या खासगी वाहनांवर होणार कडक कारवाई

ठाणे आरटीओचा इशारा

Next
ठळक मुद्देवाहन परवानाही होणार रद्द ठाणे आरटीओचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एकीकडे राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांचा संप बुधवारीही सुरूच असताना अनेक ठिकाणी खासगी वाहतूक चालकांनी मनमानी भाडे आकारले. प्रवाशांची सोय करताना कोणी जर मनमानी भाडे आकारत असेल, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी वायू वेग पथकेही तयार केली असून, विशेष नियंत्रण कक्षाचीही निर्मिती केल्याची माहिती ठाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंभर शिंदे यांनी बुधवारी दिली.
आपल्या मागण्यांवर एसटीचे संपकरी ठाम राहिल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. अशावेळी खासगी बसेसने प्रवास करणाऱ्यांकडून जादा भाडे आकारणी सुरू आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत येणाऱ्या ठाणे (खोपट), ठाणे (वंदना), भिवंडी आणि शहापूर या चार डेपोंमधून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी महापालिकेसह खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांशी संपर्क साधून जादा बसेस उपलब्ध केल्या जात आहेत. त्या पोलीस संरक्षणात चालविण्यात येणार आहेत. मालवाहू वाहनांसह स्कूल बस आणि खासगी बसमधूनही प्रवासी वाहतुकीला राज्य शासनाने परवानगी दिली आहे. मात्र, खासगी बसमधून वाहतूक करताना जादा भाडे आकारल्यास संबंधित वाहन चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. संबंधित चालकाचा परवानाही रद्द करण्याची तजवीज केल्याचे शिंदे यांनी सांगितले.
* नियंत्रण कक्षात करा तक्रारी-
जादा भाडे आकारणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईसाठी ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने नियंत्रण कक्षाची निर्मिती केली आहे.
०२२-२०८१३८३८ या क्रमांकावर तक्रारी करण्याचे आवाहनही केले आहे. या क्रमांकावर तक्रारी आल्यास वायूवेग पथकांद्वारे कारवाई केली जाणार आहे.

Web Title: Strict action will be taken against private vehicles charging extra fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.