ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर अवतरला  विश्वाचा वेध घेणारा एक अवलिया स्टीफन हॉकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 05:25 PM2019-10-07T17:25:32+5:302019-10-07T17:27:40+5:30

अभिनय कट्टा ४४९ वेगळ्या नाट्यप्रयोगाने सजला होता. 

Stephen Hawking, an avialane who looks to the universe at the acting scene in Thane | ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर अवतरला  विश्वाचा वेध घेणारा एक अवलिया स्टीफन हॉकिंग

ठाण्यातील अभिनय कट्ट्यावर अवतरला  विश्वाचा वेध घेणारा एक अवलिया स्टीफन हॉकिंग

Next
ठळक मुद्देअभिनय कट्ट्यावर अवतरला  विश्वाचा वेध घेणारा एक अवलिया स्टीफन हॉकिंगअभिनय कट्टा ४४९ वेगळ्या नाट्यप्रयोगाने सजलाविज्ञानावर आधारित नाट्य

ठाणे : दर रविवारी नवीन विषय नवीन प्रयोग सादर करण्याचे सातत्य राखणाऱ्या विक्रमी अभिनय कट्ट्यावर साकारलं एक वैज्ञानिक नाट्य.नवोदित कलाकारांचं हक्काचं व्यासपीठ असलेल्या अभिनय कट्ट्यावर अवतरली स्टीफन हॉकिंग ह्या अवलीयच्या आयुष्याची प्रवासगाथा. अभिनय कट्ट्यावर सुरेंद्र दिघे लिखित आदित्य नाकती दिग्दर्शित  विज्ञानावर आधारित नाट्य 'स्टिफन हॉकिंग विश्वाचा वेध घेणारा अवलिया'.  डॉ.बेडेकर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केले.

     स्टीफन हॉकिंग एक जगप्रसिद्धशास्त्रज्ञ लहानपणापासूनच तल्लख बुद्धी लाभलेल्या स्टीफनची गणित,भौतिक शास्त्रात असामान्य प्रभुत्व असलेल्या स्टीफनने आपल्या आजारावर मत करून विज्ञान जगतात अढळ स्थान निर्माण केले.त्याच्या ह्या प्रवासात त्याचे पालक,बहीण,मित्र आणि त्याची पत्नी ह्यांची त्याला चांगली साथ मिळाली.शरीराने जरी दुर्बल असला तरी स्टीफन हॉकिंगने बुद्धीच्या जोरावर विश्वातील अनेक रहस्यांचा उलगडा केला. सदर सादरीकरणात श्रेयस साळुंखे,श्रुतिका पालकर,आयुष बाबर,रुपाली बिरादार,सोहम सकपाळ,संस्कार थोरवे,मयूर कोकमकर,प्रथम जोशी,जान्हवी महाडिक,यश देशमुख ह्यांनी अभिनय सादर केला. सुरेंद्र दिघे ह्यांनी ह्या संहितेचे लिखाण केले.अभिनय कट्ट्याचा कलाकार आदित्य नाकती ह्यांनी ह्याचे उत्कृष्ट दिग्दर्शन केले.सादर एकांकिकेचे पार्श्वसंगीत अभय पवार आणि नेपथ्य व प्रकाशयोजना परेश दळवी* ह्यांनी सांभाळली.

     विज्ञान हा विषय नाट्यरुपाने रंजकरित्या मांडण्याचं काम ह्या नाटकाने सुंदररीत्या केले.सुंदर लिखाण ,उत्कृष्ट दिग्दर्शन आणि मुलांचा सुंदर अभिनय ह्यामुळे नाटक खूपच सुंदररीत्या सादर झाले. अशा थोर शास्त्रज्ञांचा इतिहास नाट्यरूपाने सादर होऊन येणाऱ्या पिढीला समजणे गरजेचे आहे असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ बेडेकर विद्यालयाचे मुख्याद्यापक श्री.पांचाळ ह्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.

Web Title: Stephen Hawking, an avialane who looks to the universe at the acting scene in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.