बालमहोत्सवात बालकलाकारांची धम्माल, रवी पटवर्धन यांचा विशेष सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 04:56 PM2020-01-19T16:56:04+5:302020-01-19T17:02:20+5:30

बालनाट्यापासून आपल्या अभिनयाची सुरूवात करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 Special honors to Ravi Patwardhan, child artist, Dhammala at Children's Festival | बालमहोत्सवात बालकलाकारांची धम्माल, रवी पटवर्धन यांचा विशेष सत्कार

बालमहोत्सवात बालकलाकारांची धम्माल, रवी पटवर्धन यांचा विशेष सत्कार

Next
ठळक मुद्देबालमहोत्सवात बालकलाकारांची धम्मालरवी पटवर्धन यांचा विशेष सत्कारराजू तुलालवार, प्रबोध कुलकर्णी, प्रा. मंदार टिल्लू, प्रविणकुमार भारदे, किरण नाकती या पाच महागुरूंचा सत्कार

ठाणे : लहानमुलांचे मनोरंजनात्मक खेळ, पपेट शो, पालक - पाल्य संवाद, आकर्षक भेटवस्तू, लहान मुलांनी केलेले सुत्रसंचालन, बालप्रेक्षकांची तुफान गर्दी, पारितोषिक सोहळ््याने रविवारचा बालमहोत्सव हसत खेळत आणि उत्साहात रंगला. यावेळी बालनाट्यापासून आपल्या अभिनयाची सुरूवात करणाºया ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या सत्काराला उत्तर देताना पटवर्धन यांनी प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.
            प्रारंभ कला अ‍ॅकॅडमी आणि भूमी वर्ल्ड यांच्यावतीने रविवारी गडकरी रंगायतन येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. सुरूवातीला बालकलाकारांचे सादरीकरण झाले. त्यानंतर बालरंगभूमीसाठी सातत्याने योगदान देणाºया राजू तुलालवार, प्रबोध कुलकर्णी, प्रा. मंदार टिल्लू, प्रविणकुमार भारदे, किरण नाकती या पाच महागुरूंचा सत्कार करण्यात आला. विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले नरेश म्हस्के म्हणाले की, भावी पिढीला संस्कार देण्याचे काम ही मंचावरील सगळी मंडळी नि:स्वार्थीपणे काम करीत आहेत, म्हणूनच ती पुरस्काराला पात्र आहेत. अशा मंडळींचे कौतुक करणे हेच आमचे काम आहे. देशाचे नागरिक बनत असताना मुलांना घडविण्याचे काम हे मान्यवर करीत आहेत अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तुलालवार म्हणाले की, बालक्षेत्रात काम करणाºया शहरात ठाणे अव्वल आहे, सवार्धिक नाट्यसंस्था, वर्षाला सर्वाधीक नाट्यप्रयोग याच शहरात आहे. या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी अणखीन वाढली आहे. अ‍ॅकॅडमीच्या संचालिका डॉ. अरुंधती भालेराव यांनी बालकलाकारांना जशी शिस्त असते तशी बालप्रेक्षकांनाही असावी आणि याची जबाबदारी पालकांची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुंबई दुरदर्शनचे जयू भाटकर यांची विशेष उपस्थिती होती. स्टँडअप कॉमेडीयन अमोल सोनी यांनी लहान मुलांसाठी आकर्षक खेळ घेऊन त्यांचे मनोरंजन केले. मुलांनी झिंगाट, बाला अशा विविध गाण्यांवर नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला. आपल्या पाल्याबरोबर वडिलांनी सहभागी होण्याच्या खेळाने तर प्रेक्षकांमध्ये हशा पिकवला. विशेष म्हणजे मुलांनी काढलेल्या चित्रांनी रंगमंच सजविण्यात आला होता तर मुलांनी बनविलेल्या टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन रंगमंचासमोर मांडले होते. सिंधुदुर्गच्या चेतन गंगावणे यांनी सादर केलेले कळसुत्री नाटक हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.

Web Title:  Special honors to Ravi Patwardhan, child artist, Dhammala at Children's Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.