अपारदर्शक कारभारावर सोशल मीडियाचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 11:39 PM2019-11-22T23:39:06+5:302019-11-22T23:39:15+5:30

मीरा-भाईंदर महापालिका; प्रताप सरनाईक यांची आयुक्तांकडे मागणी

Social media excerpt on opaque stewardship | अपारदर्शक कारभारावर सोशल मीडियाचा उतारा

अपारदर्शक कारभारावर सोशल मीडियाचा उतारा

Next

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेमार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या कोट्यवधींच्या कामांसह झोन आणि आरक्षणबदल तसेच वृक्षतोड आदींच्या हरकती, सूचना सर्वसामान्यांपर्यंत सोडा, लोकप्रतिनिधींपर्यंतही पोहोचू नये, याची विशेष काळजी पालिका प्रशासन घेत असते. या अपारदर्शक कारभारातून सोयीच्या गोष्टी साध्य केल्या जात असल्याने आता त्यात पारदर्शकता आणण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी निविदा-हरकतींची माहिती सोशल मीडियासह फलकांच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून देण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.

महापालिकेच्या विविध विभागांमार्फत कामांच्या तसेच ठेके देण्याच्या निविदा काढल्या जातात. त्याच्या वृत्तपत्रात जाहिराती काढताना कामांचे सविस्तर स्वरूप दिले जात नाही. केवळ निविदा आॅनलाइन भरणाºया संकेतस्थळावर माहिती असल्याचे नमूद केले जाते. त्याशिवाय आरक्षण आणि झोन बदलासह टीडीआर देणे, विकास आराखडा बदल, झाडांची तोड करणे याबाबत मागवण्यात येणाºया हरकती सूचनांची माहितीही केवळ एकदुसºया वृत्तपत्रात जाहिरातीद्वारे दिली जाते. पूर्वी मर्यादित वृत्तपत्रे असल्याने अशा जाहिराती निदर्शनास यायच्या; पण आता वृत्तपत्रांची संख्या खूपच वाढली आहे. दुसरीकडे लोक डिजिटल होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कामांच्या निविदा, दिले जाणारे ठेके, आरक्षण - झोन बदलासह वृक्षतोड आदींबाबतच्या हरकती-सूचनांची माहिती शहरातील सामान्य नागरिकांनाच नव्हे तर बहुसंख्य लोकप्रतिनिधींनाही कळत नाही. आपल्या परिसरात काय कामे निघाली, झाडांची तोड, आरक्षण आदी बदलांची माहिती सर्व प्रक्रिया उरकून गेल्यावर लोकांना आणि लोकप्रतिनिधींना कळते.

टेंडर टक्केवारीसह विशिष्ट ठेके मिळावेत, विकासक वा राजकीय संबंध असणाऱ्यांचे भूखंड झोन-आरक्षणातून वळते व्हावेत, यासाठी हा सर्व घोटाळेबाज आटापिटा केला जातो. विशिष्ट मर्जीतले ठेकेदाराचे हित व हितसंबंध असणाºया विषयांची वाच्यता न करता गैरप्रकार साधले जातात. पालिकेचा कारभार हाकणारे ठरावीक नेते आणि अधिकारीवर्ग अर्थपूर्ण हितासाठी हे करत असतात.

या घोटाळेबाज अपारदर्शक कारभाराला चाप लावण्यासाठी आ. सरनाईकांनी आयुक्त बालाजी खतगावकरांना लेखी पत्र दिले आहे. जाहीर निविदा, सूचना व हरकतींची माहिती व्यापक स्वरूपात सर्वसामान्य नागरिकांसह तसेच लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदींना कळावी, यासाठी ती पालिका संकेतस्थळ, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदींवर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. काढलेली कामे व ठेके याच्या जाहिराती सविस्तर तपशिलासह दिल्या जाव्यात. वृक्षतोड, आरक्षण-झोन बदलसारख्या विषयांप्रकरणी त्या-त्या भागातील नागरिकांच्या माहितीसाठी सूचना फलक लावले जावेत, अशी मागणी आ. सरनाईकांनी केली आहे.

सूचना फलक लावणे बंधनकारक; ठेकेदारांवर कारवाई करा!
शहरात पालिकेची जी कामे सुरू आहेत, त्याठिकाणी कामाच्या माहितीचे तर बांधकाम सुरू असणाºया ठिकाणी बांधकाम परवानगी आदींची माहिती असलेले सूचना फलक लावणे आधीपासून बंधनकारक आहे.
तरीही त्याचे पालन केले जात नाही. याप्रकरणी असे कामाच्या माहितीचे फलक न लावणाºया ठेकेदारांसह विकासक व वास्तुविशारद यांच्यावर कारवाई करा, असे आयुक्तांना सांगितले आहे.

Web Title: Social media excerpt on opaque stewardship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.