सिग्नल शाळेतील मुले जग घडवणार - अंकुश चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 02:55 AM2018-12-25T02:55:57+5:302018-12-25T02:56:11+5:30

राज्यातील अन्य शहरांत सिग्नलवरील मुलांनादेखील चांगले शिक्षण मिळावे, यासाठी तीनहातनाक्याच्या सिग्नल शाळेच्या धर्तीवर त्यात्या ठिकाणी शाळा असाव्यात.

 Signal school will create the world - Ankush Chaudhary | सिग्नल शाळेतील मुले जग घडवणार - अंकुश चौधरी

सिग्नल शाळेतील मुले जग घडवणार - अंकुश चौधरी

Next

ठाणे : राज्यातील अन्य शहरांत सिग्नलवरील मुलांनादेखील चांगले शिक्षण मिळावे, यासाठी तीनहातनाक्याच्या सिग्नल शाळेच्या धर्तीवर त्यात्या ठिकाणी शाळा असाव्यात. या शाळेतील मुले उद्याचे सुंदर जग घडवतील, यावर माझा संपूर्ण विश्वास आहे, अशा भावना सिनेअभिनेते अंकुश चौधरी यांनी रविवारी ठाण्यात व्यक्त केल्या.
भीक ते शिक, पुलाखाली भुतं ते रोबोटिक, कंटेनरवर्ग ते मॉडेल स्कूल असा अवघ्या अडीच वर्षांचा विलक्षण प्रवास ‘मुक्काम पोस्ट तीनहातनाका’ या विशेषांकाच्या माध्यमातून उलगडला. या विशेषांकाचे प्रकाशन रविवारी सिग्नल शाळेत झाले. यावेळी अंकुश चौधरी म्हणाले की, सिग्नलवरील छोटीछोटी मुले सिग्नल शाळेमुळे शिक्षणाच्या मूळ प्रवाहात येऊ शकली. या शाळेत ठाणे शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर कोणताही आडपडदा न ठेवता त्यांना शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून सिग्नल शाळा मोठी केली पाहिजे. आपल्याला नको कोणती जात, नको कोणता पंथ-रंग, आपण सगळे एकत्र येऊन केवळ या शाळेला मदत नाही, तर माणुसकी म्हणून सहकार्य करू या, असे आवाहन त्यांनी केले. या मुलांकडून आपण खूप गोष्टी शिकण्यासारख्या असून या शाळेत शिकवणारे शिक्षक हे कोणत्याही मानधनाशिवाय काम करत आहेत. हे खूपच कौतुकास्पद आहे.
अभिजित पानसे, अवधूत गुप्ते, अजित परब, अतुल परचुरे, अमेय खोपकर, विजू माने, शिरीष लाटकर, जयंत पवार आदी सिनेकलावंत, दिग्दर्शक या अंकाच्या प्रकाशनाला उपस्थित होते. पालिका उपायुक्त मनीष जोशी, डॉ. सुबोध मेहता, डॉ. मेधा भावे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व सिग्नल शाळेच्या प्रवासात गेल्या अडीच वर्षांत साथ देणारे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ‘मुक्काम पोस्ट तीनहातनाका’ या अंकाचे मानद संपादकत्व अभिजित पानसे यांनी भूषवले. दिग्दर्शक विजू माने, शिरीष लाटकर, जयंत पवार, डॉ. विजया वाड, कौशल इनामदार, कुशल बद्रिकेहे अंकाचे अतिथी संपादक आहेत. आरती पवार-परब या अंकाच्या संपादिका असून प्रियंका लबदे यांनी संपादन साहाय्य केले आहे.

Web Title:  Signal school will create the world - Ankush Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.