धक्कादायक! ठाण्यात सिगारेटची विक्री करणाऱ्यास अटक: सव्वा लाखांचा सिगारेटचा साठा हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 11:00 PM2020-04-09T23:00:45+5:302020-04-09T23:06:44+5:30

एकीकडे लॉकडाऊनममुळे सिगारेट तंबाखू विक्रीची दुकाने गेल्या १५ दिवसांपासून पूर्णपणे बंद आहेत. अशाही स्थितीमध्ये बेकायदेशीरपणे सिगारेटच्या पाकिटांची काळया बाजारात विक्री करणा-या सुनिलकुमार गुप्ता (३०) याला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ७३ बॉक्समधील १५०० पेक्षा अधिक सिगारेटची पाकिटे जप्त केली आहेत.

Shocking! Thane police arrested accused for selling cigarettes | धक्कादायक! ठाण्यात सिगारेटची विक्री करणाऱ्यास अटक: सव्वा लाखांचा सिगारेटचा साठा हस्तगत

कासारवडवली पोलिसांची कारवाई

Next
ठळक मुद्देकासारवडवली पोलिसांची कारवाई७३ बॉक्समधील १५०० पेक्षा अधिक सिगारेटची पाकिटे जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यातील कासारवडवली भागात बेकायदेशीरपणे सिगारेटसची विक्री करणा-या सुनिलकुमार गुप्ता (३०, रा. डोंगरीपाडा, ठाणे) याला कासारवडवली पोलिसांनी बुधवारी अटक केली आहे. त्याच्याकडून एक लाख २८ हजारांची सिगारेटची पाकिटेही जप्त केली आहेत.
कासारवडवली भागातील किंगकाँगनगर येथील गुप्ता चाळीमध्ये एक व्यक्ती बेकायदेशीरपणे सिगारेटच्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना त्यांच्या खबºयाने दिली होती. याच माहितीच्या आधारे ८ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास डोंगरी पाडा येथे सापळा रचून सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव, पोलीस हवालदार एस. बी. खरात, आर. एस. चौधरी आणि चंद्रकांत गायकवाड आदींच्या पथकाने गुप्ता याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून विविध कंपन्यांची १५०० पेक्षा जास्त सिगारेटची पाकिटे ७३ बॉक्समधून जप्त केली. त्याच्याविरुद्ध साथ प्रतिबंधक कायदा कलम १८८ सह सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ कायदा २००३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Shocking! Thane police arrested accused for selling cigarettes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.