धक्कादायक! ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 10:28 PM2020-09-23T22:28:26+5:302020-09-23T22:32:37+5:30

ट्रकच्या धडकेत अजयकुमार तिवारी (३९) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना नाशिक मुंबई मार्गावरील खारेगाव खाडी पुलावर मंगळवारी सायंकाळी घडली. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रक चालकाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Shocking! Motorcyclist killed in truck collision | धक्कादायक! ट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यु

कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा

Next
ठळक मुद्देखारेगाव खाडी पूलावरील घटनाकळवा पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ट्रकच्या धडकेत अजयकुमार नरेंद्रनाथ तिवारी (३९, रा. मुंब्रादेवी कॉलनी, दिवा, ठाणे) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यु झाल्याची घटना नाशिक मुंबई मार्गावरील खारेगाव खाडी पुलावर मंगळवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिवारी हे २२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास नाशिक - मुंबई राष्ट्रीय  महामार्गावरील खारेगाव खाडी पूलावरुन जात होते. त्याचवेळी त्यांच्यामागून आलेल्या एका भरघाव ट्रकने त्यांच्या मोटारसायकलीला जोरदार धडक दिली. या अपघातात तिवारी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध कलम ३०४ अ तसेच २७९ नुसार कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक एन. ए. कानडे हे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: Shocking! Motorcyclist killed in truck collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.