धक्कादायक! अवघ्या ५०० रुपयांसाठी ठेकेदाराचा खून करणाऱ्या मजूराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 10:33 PM2020-10-23T22:33:11+5:302020-10-23T22:38:15+5:30

ठेकेदाराकडे नळ दुरुस्तीच्या कामाची मजूरीची मागणी करुनही ती न दिल्याने अखेर किमान पाचशे रुपये तरी मिळावेत, अशी मजूराने मागणी केली. मात्र, त्याने ती देण्याऐवजी या मजूरालाच शिवीगाळ केली. अखेर संतप्त झालेल्या सूरज सरोज या मजूराने त्याच्याच नात्यातील विजय सरोज या ठेकेदाराचा निर्घृण खून केल्याची घटना ठाण्यातील घोडबंदर रोडवर गुरुवारी घडली. या खूनात ठाणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Shocking! Man arrested for killing contractor for just Rs 500 | धक्कादायक! अवघ्या ५०० रुपयांसाठी ठेकेदाराचा खून करणाऱ्या मजूराला अटक

नळ दुरुस्तीच्या हत्याराने केला खून

Next
ठळक मुद्देकासारवडवली पोलिसांची कारवाईनळ दुरुस्तीच्या हत्याराने केला खून

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अवघ्या पाचशे रुपयांसाठी नळ दुरुस्ती करणाºया विजय राम उजागीर सरोज (३८, रा. मोघरपाडा, ठाणे) या ठेकेदाराचा त्याचाच नातेवाइक असलेल्या सूरज सरोज (२३, रा. इंदिरानगर, ठाणे) या मजूराने नळाच्या अवजाराचे डोक्यात १० ते १२ घाव घालून निर्घृण खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. या हत्येनंतर परराज्यात पळून जाण्याच्या तयारीतील सूरजला कासारवडवली पोलिसांनी अटक केली आहे.
सुकूर रेसिडेन्सी कॉम्पलेक्स इमारत क्रमांक ए- १ च्या प्रवेशद्वारासमोर आनंदनगर घोडबंदर रोड येथे २२ आॅक्टोबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हे थरारनाटय घडले. गेल्या चार वर्षांपासून सूरज हा विजय या नळ दुरुस्तीची कामे करणाºया ठेकेदाराकडे काम करीत होता. यात त्याचे सुमारे १२ हजार रुपये कामाच्या पैशांची थकबाकी होती. शिवाय, विजय हा त्याच्या कामासाठी लागणारी नळ दुरुस्तीची अवजारेही सूरजला देत नसे. त्याचबरोबर तो त्याला अन्यत्रही काम करु देत नव्हता. गुरुवारी नेहमीप्रमाणे तो त्याच्याकडे केलेल्या कामाची थकबाकी घेण्यासाठी आला. संपूर्ण १२ हजार रुपये देत नसशील तर रोजच्या खर्चीसाठी किमान पाचशे रुपये आणि नळ दुरुस्तीसाठी लागणाºया २४ क्रमांकाच्या पान्हयाचीही त्याने मागणी केली. त्यानंतर हा २४ क्रमांकाचा पान्हा सूरज घेऊन जात होता. तेंव्हा विजयने पाचशे रुपये तर दिले नाहीच, शिवाय त्याने सूरजला शिवीगाळही केली. त्यावेळी रागाच्या भरात सूरजने विजयला त्याच नळ दुरुस्तीच्या पान्हयाने डोक्यात जबर प्रहार केले. हे घाव त्याच्या वर्मी लागून तो तिथेच बेशुद्ध पडला. त्यानंतरही सूरजने प्रहार करणे सुरुच ठेवल्याने विजयच्या डोक्याचा अक्षरश: चेंदामेंदा झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कासारवडवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, वागळे इस्टेट परिमंडळचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वर्तकनगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पंकज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक सागर जाधव, उपनिरीक्षक रुपाली रत्ने, पोलीस हवालदार एस. बी. खरात, हवालदार अंकुश पाटील, पी. आर. तायडे आणि आर. एस. महापुरे आदींनी यातील आरोपी सूरज याला त्याच परिसरातून काही तासांनी अटक केली. खूनासाठी त्याने वापरलेला लोखंडी पान्हाही पोलिसांनी हस्तगत केला आहे. सूरजला ठाणे न्यायालयाने २८ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सहायक पोलीस आयुक्त शिरसाठ याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
* कामगारावरुनही झाला वाद
विजयचा कामगार परवीन हरीजन याला विजयला न सांगताच सूरज कामासाठी घेऊन आला होता. यातूनच दोघांमध्ये वाद झाल्यामुळे सूरजने विजयकडे राहिलेले पैसे मागितले. त्यानंतर वाद चिघळल्यानंतर सूरजने विजयची हत्या केली.

Web Title: Shocking! Man arrested for killing contractor for just Rs 500

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.