धक्कादायक! ठाण्यात नोकरी न सोडल्याने लोखंडी रॉडने पतीने केली पत्नीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2020 11:44 PM2020-09-17T23:44:54+5:302020-09-17T23:47:58+5:30

नोकरी सोडली नाही तर घटस्फोटाची धमकी देत पत्नीला लोखंडी रॉडने डोक्यावर आणि पाठीवर मारहाण केल्याची घटना ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात घडली आहे. या घटनेने संबंधित पतीविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.

Shocking! Husband beats wife with iron rod on head | धक्कादायक! ठाण्यात नोकरी न सोडल्याने लोखंडी रॉडने पतीने केली पत्नीला मारहाण

नोकरी न सोडल्यास सोडून देण्याचीही दिली धमकी

Next
ठळक मुद्दे वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोकरी न सोडल्यास सोडून देण्याचीही दिली धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: कामावर गेलीस तर तुला सोडून देईल आणि दुसऱ्या मुलीशी लग्न करील, अशी धमकी देत पूनम पासी (२५) या पत्नीला लोखंडी रॉडने जबर मारहाण करणाºया संजय पासी (३२, रा. वागळे इस्टेट, ठाणे) या पतीविरुद्ध बुधवारी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वागळे इस्टेट शिवाजी वाडी चाळ याठिकाणी वास्तव्याला असलेल्या पासी दांम्पत्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पूनम यांच्या नोकरी करण्यावरुन वाद सुरु आहे. १६ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान पूनम या नेहमीप्रमाणे वागळे इस्टेट येथील एएस बुक डेपो येथे नोकरीलला गेल्या. मात्र, या नोकरीच्या ठिकाणी सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा पती संजय त्याठिकाणी आला. त्या कामात व्यस्त असतांनाच त्याने त्यांना शिवीगाळ केली. ‘तू इथे कामावर का आलीस, तुला सांगितले होते ना जर तू कामावर गेलीस तर तुला सोडून देईल आणि दुसºया मुलीसोबत मी लग्न करील,’ अशी धमकी देत त्याने त्यांना लोखंडी रॉडने त्यांच्या पाठीवर आणि डोक्यावर मारहाण केली. यात त्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात संजयविरुद्ध तक्रार दाखल झाली असून पोलीस उपनिरीक्षक एस. डी. पानसरे हे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Shocking! Husband beats wife with iron rod on head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.