धक्कादायक! हाणामारीतील कोरोनाग्रस्त आरोपीमुळे ठाण्यातील कापूरबावडीच्या २० पोलिसांना व्हावे लागले कॉरंटाईन

By जितेंद्र कालेकर | Published: May 11, 2020 11:33 PM2020-05-11T23:33:15+5:302020-05-11T23:41:46+5:30

कोलशेत रोडवरील एका सोसायटीमध्ये पाणी भरण्यावरुन मजूरांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी अटक केलेल्या १३ पैकी एकाला कोरोनाची लागण झाल्याचे न्यायालयीन कोठडीत नेण्यापूर्वी समोर आले. त्यामुळे उर्वरित १२ आरोपींसह त्यांच्या संपर्कातील २० पोलीस कर्मचाऱ्यांना कॉरंटाईन केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

 Shocking! 20 policemen from Kapurbawdi had to be quarantined due to the coronation of the accused | धक्कादायक! हाणामारीतील कोरोनाग्रस्त आरोपीमुळे ठाण्यातील कापूरबावडीच्या २० पोलिसांना व्हावे लागले कॉरंटाईन

१२ आरोपीं आणि २० पोलिसांना केले कॉरंटाईन

googlenewsNext
ठळक मुद्देन्यायालयीन कोठडीच्या वेळी झाली चाचणी १२ आरोपीं आणि २० पोलिसांना केले कॉरंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लोढा आमरा याठिकाणी झालेल्या हाणामारीतील आरोपीची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आल्यामुळे कापूरबावडी पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली. त्याला आता ठाणे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून उर्वरित १२ आरोपींना भार्इंदर पाडा येथील केंद्रात कॉरंटाईन केले आहे. या आरोपींच्या संपर्कातील २० पोलिसांनाही कॉरंटाईन केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
कोलशेत रोड येथील लोढा आमरा या सोसायटीमध्ये नळावरील पाणी भरण्यावरुन काही मजूरांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. प्रकरण अगदी हाणामारीवर गेले. याप्रकरणी ४ मे रोजी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर १३ जणांना पोलिसांनी अटक केली. या सर्वांना न्यायालयाने ५ मे रोजी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर मुंबईच्या सर जेजे रुग्णालयात त्यांची ६ मे रोजी कोरोना तपासणी झाली. त्यांच्यापैकी एकाचा अहवाल हा ९ मे रोजी पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जामीनावर मुक्तता होऊनही उर्वरित १२ आरोपींना भार्इंदर येथील केंद्रामध्ये कॉरंटाईन करण्यात आले. कोरोनाग्रस्त आरोपीला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान, या आरोपींच्या संपर्कातील कापूरबावडी पोलीस ठाण्यातील २० पोलीस कर्मचाऱ्यांनाही कॉरंटाईन केले असून या सर्वांची कोरोनाची तपासणी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title:  Shocking! 20 policemen from Kapurbawdi had to be quarantined due to the coronation of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.