उल्हासनगरमधील पुनरावृत्तीचा धसका; भाजपात खदखद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 02:59 AM2020-12-03T02:59:35+5:302020-12-03T02:59:47+5:30

नगरसेवकांची जाणून घेतली मते

The shock of repetition in Ulhasnagar; In the BJP | उल्हासनगरमधील पुनरावृत्तीचा धसका; भाजपात खदखद  

उल्हासनगरमधील पुनरावृत्तीचा धसका; भाजपात खदखद  

Next

भाईंदर :   उल्हासनगर महापालिकेत महापौरपदापाठोपाठ स्थायी समिती सभापतीपद गमवाव्या लागलेल्या भाजपला मीरा भाईंदरमधील असंतोष पाहता उल्हासनगरच्या पुनरावृत्तीची धास्ती वाटू लागली आहे. त्यातूनच प्रभारी असलेले आमदार मिहीर कोटेचा यांनी ५५ नगरसेवकांशी स्वतंत्र चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली.

अनेक ज्येष्ठ व दिग्गज नगरसेवकांसह स्वतः जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे आदींनी माजी आमदार नरेंद्र मेहतांच्या विरोधात आघाडी उघडली आहे. ‘मेहता हटाव व भाजप आणि शहर बचाव’ अशी भूमिका पुढे आली आहे. उल्हासनगरची जबाबदारी सांभाळणारे आमदार रवींद्र चव्हाण हेच मीरा-भाईंदरमध्येही प्रभारी म्हणून लक्ष देतात. स्थायी समिती सदस्य नियुक्ती आणि सभापती पदासाठी मेहता व मेहता विरोधी गटात संघर्ष सुरू झाला आहे. कोटेचा यांनी प्रभारी पदाची सूत्रे स्वीकारून नुकतीच नगरसेवकांची भेट घेतली होती. 

मंगळवारी त्यांनी मीरा रोडच्या जीसीसी क्लबमध्ये प्रत्येक नगरसेवकाशी चर्चा करून त्यांची मते जाणून घेतली. या वेळी माजी आमदार नरेंद्र मेहता, आमदार रवींद्र चव्हाण दिसले नाहीत. उल्हासनगरचा अनुभव पाहता चव्हाणांनाही लांब ठेवण्यात आल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. मेहता समर्थक काही नगरसेवकांनी मेहतांमुळेच भाजपची पालिकेत सत्ता आली. आम्ही त्यांच्यामुळे निवडून आलो.  मेहतांनी शहरात खूप कामे केली, अशी भूमिका मांडली. काही नगरसेवकांनी भाजपमधील दोन गटांतील अंतर्गत वाद लवकर मिटवावा जेणेकरून २०२२च्या पालिका निवडणुकीत भाजपला पुन्हा स्वबळावर सत्ता आणता येईल, असा सूर आळवला.

... तर पालिका निवडणूक जिंकणे अशक्य
अनेक नगरसेवकांनी मात्र मोदींची लाट, चार नगरसेवक प्रभाग पद्धत आणि इतर पक्षांतून मोठ्या संख्येने आलेल्या नगरसेवक - कार्यकर्त्यांमुळे २०१७ च्या पालिका निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळाले, असे सांगतानाच मेहतांच्या वादग्रस्त प्रतिमेमुळे विधानससभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. मेहतांच्या वादग्रस्त प्रतिमेवर २०२२ ची पालिका निवडणूक जिंकणे अशक्य असल्याचेही सांगितल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

Web Title: The shock of repetition in Ulhasnagar; In the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.