उल्हासनगरातील शिवसेनेचे ‘स्थायी’ सदस्य ठाण्याच्या हॉटेलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 02:10 AM2020-10-29T02:10:23+5:302020-10-29T02:19:43+5:30

Ulhasnagar News : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपचे विजय पाटील यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देऊन व भाजपच्या एका सदस्याला राजीनामा देण्यास भाग पाडून शिवसेनेने बाजी मारली आहे. मात्र, अखेरच्या टप्प्यात भाजपकडून फोडाफोडी होऊ नये, याकरिता शिवसेनेने कडेकोट बंदोबस्त केला आहे.

Shiv Sena's 'permanent' member in Ulhasnagar at a hotel in Thane | उल्हासनगरातील शिवसेनेचे ‘स्थायी’ सदस्य ठाण्याच्या हॉटेलमध्ये

उल्हासनगरातील शिवसेनेचे ‘स्थायी’ सदस्य ठाण्याच्या हॉटेलमध्ये

Next

- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या उद्या (गुरुवारी) होणाऱ्या निवडणुकीकरिता भाजपचे गटनेते व शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी बुधवारी व्हीप जारी केला, तर शिवसेनेने आपल्या पाच सदस्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस व रिपाइंचा प्रत्येकी एक सदस्य अशा एकूण सात सदस्यांची ठाण्यातील एका हॉटेलमध्ये वास्तव्याची व्यवस्था केली आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात भाजपचे विजय पाटील यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देऊन व भाजपच्या एका सदस्याला राजीनामा देण्यास भाग पाडून शिवसेनेने बाजी मारली आहे. मात्र, अखेरच्या टप्प्यात भाजपकडून फोडाफोडी होऊ नये, याकरिता शिवसेनेने कडेकोट बंदोबस्त केला आहे.

उल्हासनगरात स्थायी समिती सभापतीपदाची ही निवडणूक गुरुवारी दुपारी १२ वाजता होणार आहे. शिवसेना आघाडीचे सभापतीपदाचे उमेदवार भाजपचे समिती सदस्य विजय पाटील हेही इतर सदस्यांसोबत हॉटेलात मुक्काम करून आहेत. एकूण १६ सदस्यसंख्या असलेल्या स्थायी समितीमध्ये भाजपचे-९, शिवसेना-५, तर रिपाइं-राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक असे पक्षीय बलाबल आहे. भाजपचे सदस्य असलेले पाटील हे शिवसेनेच्या वतीने रिंगणात उतरले असून भाजपचे दुसरे समिती सदस्य प्रकाश नाथानी यांनी मंगळवारी सदस्यपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे शिवसेना आघाडी बहुमतात आली असून पाटील यांचा विजय निश्चित आहे. 

विजय पाटील यांच्या घराला व्हीप चिकटवला
महापालिका स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे गटनेते व शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांनी पक्षाच्या सर्वच्या सर्व आठ स्थायी समिती सदस्यांना व्हीप जारी केला. पक्षाचे समिती सदस्य पाटील हे शिवसेनेचा पाठिंबा घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासकट सर्व समिती सदस्यांचा मुक्काम ठाणे येथील एका हॉटेलमध्ये आहे. भाजपने काढलेला व्हीप पाटील यांच्या घराबाहेरील दरवाजावर चिकटवला असल्याची माहिती पुरस्वानी यांनी दिली.

Web Title: Shiv Sena's 'permanent' member in Ulhasnagar at a hotel in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.