शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळेंनी फाडले राष्ट्रवादीचे बॅनर; आनंद परांजपेंनी जारी केले CCTV फुटेज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 05:38 PM2021-10-18T17:38:55+5:302021-10-18T17:39:49+5:30

शनिवारी पहाटे तीन वाजता राष्ट्रवादीचे बॅनर फाडण्यात आले होते. या बॅनर फाडण्यामागे शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे हेच असल्याचा गौप्यस्फोट आनंद परांजपे यांनी केला.

Shiv Sena corporator Ganesh Kamble tore down NCP banner; CCTV footage released by Anand Paranjape | शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळेंनी फाडले राष्ट्रवादीचे बॅनर; आनंद परांजपेंनी जारी केले CCTV फुटेज

शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळेंनी फाडले राष्ट्रवादीचे बॅनर; आनंद परांजपेंनी जारी केले CCTV फुटेज

Next

ठाणे : कळव्यात शनिवारी घेण्यात येणाऱ्या लसीकरणाचे बॅनर राष्ट्रवादीकडून लावण्यात आले होते. परंतु रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी ते बॅनर फाडल्याची घटना समोर आली होती. हे बॅनर शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळेंनी फाडल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला आहे. याचे सीसीटीव्ही फुटेज त्यांनी जारी केले आहे. 

राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत थेट ट्विट करुन पोलिसांनी याची तत्काळ दखल घेतली नाही तर पक्षाचे कार्यकर्ते आंदोलन करतील असा इशारा दिला होता. दुसरीकडे याच मुद्यावरुन राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांनी या लसीकरणावरुन थेट शिवसेना आणि पालिका प्रशासनावर टीका केल्याने महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे.

शनिवारी पहाटे तीन वाजता राष्ट्रवादीचे बॅनर फाडण्यात आले होते. या बॅनर फाडण्यामागे शिवसेनेचे नगरसेवक गणेश कांबळे हेच असल्याचा गौप्यस्फोट आनंद परांजपे यांनी केला. हे बॅनर गणेश कांबळे यांनीच फाडले असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. अरविंद मोरे यांनी या संदर्भात कळवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी सत्याच्या, न्यायाच्या बाजूने उभे रहावे, असे परांजपे म्हणाले. 



 

पालकमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या संस्कारातून घडलेले शिवसैनिक असे कृत्य करणार नाहीत. त्यांच्या या विधानाशी आपण सहमत आहोत. पण, उसने आवसान आणून निर्माण झालेल्या शिवसैनिकांनी हे कृत्य केलेले आहे, असा आरोप आनंद परांजपे यांनी केला आहे. 

Web Title: Shiv Sena corporator Ganesh Kamble tore down NCP banner; CCTV footage released by Anand Paranjape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.