पालघरमध्ये घरोघरी तपासणीतून बाधित-संशयित रुग्णांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:18 AM2020-09-20T01:18:08+5:302020-09-20T01:18:18+5:30

प्रत्येकाचे तापमान, आॅक्सिजन पातळी तपासणार। ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम

Search of infected-suspected patients through house-to-house check in Palghar | पालघरमध्ये घरोघरी तपासणीतून बाधित-संशयित रुग्णांचा शोध

पालघरमध्ये घरोघरी तपासणीतून बाधित-संशयित रुग्णांचा शोध

Next




लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम राज्यात राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पालघर जिल्ह्यातही घरोघरी नागरिकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. वसई महापालिकेसह जिल्ह्यातील अन्य ठिकाणी ही मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेद्वारे बाधित तसेच संशयित रुग्णांचा शोध घेतला जात आहे.
वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत नियुक्त कर्मचारी व स्वयंसेवक दररोज महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील किमान ५० घरांना प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचे शारीरिक तापमान व आॅक्सिजनची पातळी तपासणार आहेत. या भेटीदरम्यान कोरोनाबाधित व संशियत रुग्णांचा शोध घेतला जाणार असून त्यांना कोरोना सेंटरमध्ये दाखल करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वसई महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर सध्या प्रचंड ताण आलेला आहे. सदर मोहीम राबविण्यासाठी अधिक प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेता इच्छुक स्वयंसेवकांनी त्यांच्या क्षेत्रातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन मोहिमेत सहभागी होण्यासाठी नोंद करावी. ही मोहीम लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने, नागरिकांच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने राबविण्यात येणार असल्याने अधिकाअधिक स्वयंसेवक मोहिमेसाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन वसई-विरार शहर महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
या भेटीदरम्यान कोरोनाबाधित व संशियत रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. मोहिमेअंतर्गत मधुमेहासह इतर आजार असलेल्या व्यक्तींना त्याच्याशी उपचारदेखील देण्यात येतील. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय महत्त्वाची पाऊले उचलायला हवीत याची माहिती नागरिकांना दिली जाणार आहे.

वाड्यात शुभारंभ : हृदयविकार, मधुमेह, लठ्ठपणाचा आजार असलेल्यांवरही होणार उपचार
च्वाडा : तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचा शुभारंभ शनिवारी वाडा पंचायत समितीचे सभापती योगेश गवा यांच्या हस्ते पाली येथे करण्यात आले.
च्ग्रामविकास विभाग, आरोग्य व एकात्मिक बालविकास विभाग विभागामार्फत नियुक्त कर्मचारी व स्वयंसेवक दररोज कार्यक्षेत्रातील किमान ५० घरांना प्रत्यक्ष भेट देऊन प्रत्येक कुटुंबातील सदस्यांचे
शारीरिक तापमान व आॅक्सिजनची पातळी तपासतील.
च्या भेटीदरम्यान कोरोनाबाधित व संशयित रुग्णांचा शोध घेतला जाईल. मोहिमेअंतर्गत मधुमेहासह इतर आजार (उदा. हृदयविकार, मूत्रपिंडाचा आजार, लठ्ठपणा इ.) असलेल्या व्यक्तींना संदर्भित उपचार देखील देण्यात येतील. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने कोणती महत्त्वाची पावले उचलायला हवीत याची माहिती दिली जाईल. मोहिमेदरम्यान कर्मचारी व स्वयंसेवक प्रत्येक कुटुंबास दोन वेळा भेट देणार आहेत.
च्कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आलेला आहे. सदर मोहीम राबविण्यासाठी अधिक प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेता इच्छुक स्वयंसेवकांनी त्यांच्या क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन मोहिमेत सहभागी होण्यासाठी आपली नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
च्माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने व नागरिकांच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने राबविण्यात येणार असल्याने अधिकाधिक स्वयंसेवक मोहिमेसाठी उपलब्ध करून देण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सभापती, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फ त लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था व नागरिकांना करण्यात येत आहे.

Web Title: Search of infected-suspected patients through house-to-house check in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.