रस्ते - पदपथ वर बांधकाम साहित्याचे अतिक्रमण; झाडांमध्ये देखील साहित्य टाकल्याने झाडं मेली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 11:12 AM2021-01-14T11:12:52+5:302021-01-14T11:13:27+5:30

रस्ते - व पदपथ हे नागरिकांना रहदारी साठी मोकळे ठेवण्याची जबाबदारी महापालिका प्रशासना सह स्थानिक नगरसेवकांची देखील आहे . परंतु शहरातील रस्ते - पदपथ आधीच फेरीवाले व दुकानदारांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत .

Roads - encroachment of construction materials on sidewalks; Even putting material in the trees killed the trees | रस्ते - पदपथ वर बांधकाम साहित्याचे अतिक्रमण; झाडांमध्ये देखील साहित्य टाकल्याने झाडं मेली

रस्ते - पदपथ वर बांधकाम साहित्याचे अतिक्रमण; झाडांमध्ये देखील साहित्य टाकल्याने झाडं मेली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिका आणि स्थानिक नगरसेवकांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षा मुळे शहरात ठिकठिकाणी रस्ता - पदपथा वर बांधकाम साहित्य टाकून विकासक आदींनी अतिक्रमण केले आहे . झाडां मध्ये देखील बांधकाम साहित्य टाकून ठेवले जात असल्याने झाडे मरण पावली आहेत . 

रस्ते - व पदपथ हे नागरिकांना रहदारी साठी मोकळे ठेवण्याची जबाबदारी महापालिका प्रशासना सह स्थानिक नगरसेवकांची देखील आहे . परंतु शहरातील रस्ते - पदपथ आधीच फेरीवाले व दुकानदारांच्या अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत . त्यावर ठोस कार्यवाही केली जात नसताना बांधकाम साहित्य पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यां पासून विकासकांनी देखील रस्ते - पदपथ स्वतःची खाजगी मालमत्ता समजून त्यावर सर्रास बांधकाम साठीचे साहित्य टाकून ठेवलेले आहे . 

बांधकामा साठी लागणारे दगड , खडी , विटा , रेती सह खोदकामातून निघालेली माती आदी बेधडक पणे रस्ता - पदपथा वर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून ठेवत आहेत . मीरारोडच्या ऑरेंज रुग्णालयाच्या मार्गावर तर एका इमारतीचे बांधकाम   सुरु असणाऱ्या एका विकासकाने अनेक महिन्यां पासून रस्ता - पदपथ वर बांधकाम साहित्य टाकून ठेवले आहे . झाडां मध्ये देखील बांधकाम साहित्य टाकून ठेवल्याने झाड मेल्याचे प्रकार घडले आहेत . नागरिकांना रहदारीला अडथळा होत आहे . परंतु स्थानिक नगरसेवक महापालिकेचे सर्व संबंधित अधिकारी मात्र जाणीवपूर्वक त्या कडे काणाडोळा करत आहे . 

शहरात नागरिकांना वेठीस धरणारे असे प्रकार सर्रास सुरु असूनही स्थानिक नगरसेवक व पालिका अधिकाऱ्यांनी डोळ्यावर नोटांच्या पट्ट्या बांधल्या आहेत का ? असा सवाल मनसेचे शहराध्यक्ष हेमंत सावंत यांनी केला आहे . ह्या प्रकरणी नागरी झाडांचे संरक्षण कायदा तसेच एमआरटीपी व महापालिका अधिनियमाचे सह भादंविच्या कलमां खाली गुन्हा दाखल करावा .  दंड वसूल करावा अशी मागणी सावंत यांनी केली आहे . 

Web Title: Roads - encroachment of construction materials on sidewalks; Even putting material in the trees killed the trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.