अवघ्या दोन तासांमध्ये ठाणे पोलिसांनी केली रिक्षा चोराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 11:51 PM2020-09-29T23:51:15+5:302020-09-29T23:54:00+5:30

हाजूरीतील गौतमनगर भागातून रिक्षा चोरणाऱ्या संजय दत्तराव मंचेकर (२५, रा. घाटकोपर, मुंबई) याला सोमवारी वागळे इस्टेट पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये अटक केली. एक रिक्षा चोरल्यानंतर दुसरी रिक्षा चोरुन पलायनाच्या बेतात असतांनाच पेट्रोलिंगवरील पोलिसांनी त्याला पकडले.

Rickshaw thief arrested by Thane police in just two hours | अवघ्या दोन तासांमध्ये ठाणे पोलिसांनी केली रिक्षा चोराला अटक

चोरीचा गुन्हा उघड

googlenewsNext
ठळक मुद्दे एक लाख ६० हजारांच्या दोन रिक्षा जप्त चोरीचा गुन्हा उघड

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: वागळे इस्टेट, हाजूरीतील गौतमनगर भागातून रिक्षा चोरणाºया संजय दत्तराव मंचेकर (२५, रा. घाटकोपर, मुंबई) याला सोमवारी वागळे इस्टेट पोलिसांनी अवघ्या दोन तासांमध्ये अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन रिक्षाही जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हाजूरी दर्गा रोड, गौतमनगर येथील रहिवाशी नदीम अब्दुल समद सय्यद (३१) यांनी त्यांची रिक्षा वागळे इस्टेट येथील विराज हॉस्पीटलच्या समोरील त्यांच्या घराजवळ उभी केली होती. त्याचबरोबर अंबिकानगर येथील रहिवाशी सुरेंद्र उपाध्याय यांनी त्यांची रिक्षा ही अंबिकानगर क्रमांक दोन हनुमान मंदिराजवळ उभी केली होती. या दोन्ही रिक्षा बनावट चावीच्या आधारे चोरण्यात आल्याची तक्रार २८ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास दाखल केली होती. या गुन्ह्याची पोलीस निरीक्षक वैशाली रासकर यांनी गंभीर दखल घेऊन चोरीच्या तपासाबाबत शोध पथकाला आदेश दिले होते. त्याचअनुषंगाने संजय या रिक्षा चालकाकडे चौकशी केल्यानंतर त्याच्याकडील रिक्षा चोरीची असल्याचे आढळले. त्याने आधी एक रिक्षा चोरली होती. दुसरी रिक्षा चोरुन घेऊन जात असतांना तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक फड, जमादार आंबेकर, पोलीस नाईक नितीन बांगर, अरुण बांगर, खेडकर, काशीनाथ जाधव, दिनेश महाले आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांनी संजय मंचेकर यास अटक केली. त्याच्याकडून चोरीतील दोन्ही रिक्षाही जप्त केल्या आहेत.

 

Web Title: Rickshaw thief arrested by Thane police in just two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.