मीरा-भाईंदरमध्ये अनेक ठिकाणी निर्बंध पायदळी; मास्क, साेशल डिस्टन्सिंगचाही विसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 11:46 PM2021-04-15T23:46:59+5:302021-04-15T23:50:21+5:30

Mira Bhayandar : मीरा-भाईंदरमध्ये शासनाने कोरोना रोखण्यासाठी अमलात आणलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी बुधवार रात्री ८ नंतर सुरू झाली. गुरुवारी सकाळपासून शहरात वर्दळ सुरू होती.

Restricted infantry at several places in Mira Bhayandar; Forget masks, social differences too | मीरा-भाईंदरमध्ये अनेक ठिकाणी निर्बंध पायदळी; मास्क, साेशल डिस्टन्सिंगचाही विसर

मीरा-भाईंदरमध्ये अनेक ठिकाणी निर्बंध पायदळी; मास्क, साेशल डिस्टन्सिंगचाही विसर

googlenewsNext

मीरा रोड : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे मीरा-भाईंदरमध्ये काही ठिकाणी पालन केले गेले़ तर अनेक ठिकाणी उघडपणे उल्लंघन सुरू हाेते. मात्र त्याकडे पालिका, पोलीस व नगरसेवक-राजकारणी यांनी कानाडोळा केला. जेणेकरून भाजीपाला व अन्य वस्तू विकणाऱ्या फेरीवाल्यांसह रस्ते-दुकानातून खाद्य - पेयपदार्थ विकणाऱ्यांकडे गर्दी झाली. मास्क घालणे व नियमांचे पालन तर सर्रास धाब्यावर बसवल्याचे ठिकठिकाणी दिसत होते. 
मीरा-भाईंदरमध्ये शासनाने कोरोना रोखण्यासाठी अमलात आणलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी बुधवार रात्री ८ नंतर सुरू झाली. गुरुवारी सकाळपासून शहरात वर्दळ सुरू होती.  महापालिकेने भाजीपाला-फळे यासाठी मैदानात सकाळची ७ ते ११ वेळ जाहीर केली असताना त्याला न जुमानता शहरातील मुख्य रस्ते, पदपथ आणि गल्ल्यांमध्ये त्यांची विक्री 
सुरू हाेती. 
बहुतांश फेरीवाल्यांनी मास्क हे नका-तोंडाच्या खाली घातले होते तर काहींनी घातले नव्हते. त्याठिकाणी लोकांची खरेदीसाठी गर्दी उसळली होती. गर्दीतील अनेक बेजबाबदार नागरिकांनीही मास्क नाकातोंडाच्या खाली घातले होते.  शहरात संचारबंदी लागू असूनही नागरिकांना शहाणपण सुचलेले नसल्याचेच चित्र हाेते. त्यामुळे काेराेनाला कसे राेखायचे हा प्रश्नच आहे.

खाद्यपदार्थांच्या गाड्या, हाॅटेलमध्ये गर्दी
रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या गाड्या, हाॅटेल, दुकानांतही नागरिकांनी गर्दी केली हाेती. मात्र, बहुतांश दुकाने बंद हाेती. गल्लीबाेळातील काही दुकाने अर्धे शटर उघडे ठेवून सुरू हाेती. रिक्षांचे प्रमाण जास्त नसले तरी वाहनांची वर्दळ फारशी कमी झालेली नव्हती. त्यामुळे एकूण संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत हाेता.

Web Title: Restricted infantry at several places in Mira Bhayandar; Forget masks, social differences too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.