वैद्यकीय खर्चाची जबाबदारी कोरोना रुग्णांसह सोसायटीवरही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 11:45 PM2020-06-02T23:45:17+5:302020-06-02T23:52:15+5:30

महापालिकेचे आदेश : क्लब हाउससह हॉलही आता कोविड केअर सेंटर

Responsibility for medical expenses also rests on the Society with Corona Patients | वैद्यकीय खर्चाची जबाबदारी कोरोना रुग्णांसह सोसायटीवरही

वैद्यकीय खर्चाची जबाबदारी कोरोना रुग्णांसह सोसायटीवरही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : एखाद्या गृहनिर्माण सोसायटीत कोरोनाचा कोणतेही लक्षणे नसलेला रुग्ण आढळला तर अशा रुग्णांसाठी गृहनिर्माण संस्थांमधील क्लब हाउससह मल्टिपर्पज हॉलही आता कोविड केअर सेंटर म्हणून घोषित केले असल्याची माहिती महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी दिली. तसा आदेश पारित केला असून त्याची प्रत मिळाल्यापासून पुढील तीन दिवसांत क्लब हाउस आणि मल्टिपर्पज हॉल आरक्षित करावेत असे, त्यात नमूद केले आहे. संतापाची बाब म्हणजे येथे क्वारंटाइन होणाऱ्या रुग्णांनाच त्यांचा राहणे, खाण्यापिण्यासह वैद्यकीय खर्च स्वत:ला किंवा संबंधित सोसायटीला करावा लागणार आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्रिस्तरीय वैद्यकीय आस्थापना निर्माण करण्यासाठी राज्य शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार आता ठाणे महापालिकेने हे पाऊल उचलले आहे. महापालिका हद्दीत कोरोनाची कोणतेही लक्षणे नसलेल्या रुग्णांचे प्रमाण हे जवळजवळ ८० टक्क्यांच्या आसपास आहे. परंतु, यातील ज्यांना खरोखर रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे, त्यांना रुग्णालय उपलब्ध व्हावे म्हणून हे पाऊल उचलल्याचे सिंघल यांनी स्पष्ट केले.


परिपत्रक प्राप्त झाल्यापासून पुढील तीन दिवसांत गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी महापालिकेच्या ूङ्म१ङ्मल्लंूी’’३ेू @ॅें्र’.ूङ्मे या मेल आयडीवर मेलद्वारे कोविड केअर सेंटरची नोंदणी करावी, सदर क्लब हाउसमध्ये संबंधित सोसायटीमधील सदस्यांना अलगीकरण करता येणार आहे. सोसायटीबाहेरील सदस्यांना त्यांच्या नातेवाइकांना सोसायटीच्या क्वारटाइन सेंटरमध्ये आणता येणार नाही, या क्वारंटाइन सेंटरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त सदस्यांची मागणी निर्माण झाल्यास प्रथम आलेल्या सदस्याला क्वारंटाइन करणे, हे नियमानुसार असेल.

क्वॉरंटाइन सेंटरची साफसफाई रुग्णांवरच
या सेंटरमध्ये अलगीकरण झालेल्या सदस्यास त्यांच्या कुटुंबाकडून चहा, पाणी, नास्ता, भोजन आदी पुरविण्यात येईल, आवश्यक असल्यास त्यासाठी सेफ्टी किट (मास्क) यांचा वापर करावा, कुटुंबातील सदस्यांनी क्वारंटाइन सेंटरमध्ये ठरावीक लांब अंतरावर खाद्यपदार्थ ठेवणे व क्वारंटाइन झालेल्या सदस्याने सदरच्या बाबी तेथून स्वत: घेऊन जाणे आवश्यक राहील.
रुग्णास खाद्य पदार्थ देताना नॉन रेस्युबेल साहित्याचा वापर करणे बंधनकारक असणार आहे, संबंधित क्वारंटाइन सेंटरची साफसफाई रुग्णांना स्वत: करावी लागेल. किंवा पीपीई किट परिधान केलेल्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून अशी साफसफाई करून घेता येईल.क्वारंटाइन सेंटरमधील कचरा हा बायो मेडिकल वेस्टला देणे बंधनकारक राहील.
सोसायट्यांचा विरोध : ठाण्यात केवळ १० ते १५ टक्के मोठ्या सोसायट्यांमध्ये क्लब हाउससह मल्टिपर्पज हॉल आहेत. बाहेर क्लब किंवा फिटनेस सेंटर बंद आहेत. त्यामुळे सोसायटीमधील रहिवाशांनी जायचे कुठे? सोसायटी आवारात पॉझिटिव्ह रुग्ण ठेवण्यास विरोध असून तसे पत्र आयुक्तांना देण्यात येईल. - सीताराम राणे, अध्यक्ष, ठाणे हाउसिंग फेडरेशन

१ ठाणे महापालिकेकडून तांत्रिक साहाय्य संबंधित सोसायटीमध्ये वास्तव्यास असलेले डॉक्टर्स अशा रुग्णांची देखभाल करतील, तथापि सोसायटीमध्ये वास्तव्याला डॉक्टर्स नसल्यास महापालिकेकडून वैद्यकीय अधिकारी प्राप्त करून घेणे सोसायटीला बंधनकारक राहील. सोसायटीमधील देखरेख करावयाच्या डॉक्टर्सचे मानधन देण्याची जबाबदारी संबंधित रुग्ण किंवा त्याच्या कुटुंबाची किंवा सोसायटीची असेल.
२संबंधित क्लब हाउसमध्ये जम्बो आॅक्सिजन सिलिंडर व आॅक्सिजन पुरविणारी मास्क ठेवणे संबंधित सोसायटीला बंधनकारक असणार आहे, जम्बो आॅक्सिजन सिलिंंडर प्राप्त करून घेण्यासाठी तांत्रिक साहाय्य सोसायटीमधील उपलब्ध डॉक्टर्स यांनी द्यायचे आहे.
३किंवा जर ते उपलब्ध नसेल तर आणि तांत्रिक साहाय्यक आवश्यक असल्यास सदरचे साहाय्य ठाणे महापालिकेकडून उपलब्ध करून दिले जाणार आहे. याबाबतच्या अटी व शर्ती मान्य असल्याचे पत्र सोसायट्यांनी तीन दिवसांत द्यायचे आहे.

Web Title: Responsibility for medical expenses also rests on the Society with Corona Patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.