आजारांवरील संशोधनासाठी पाच जनावरांवर रोज उपचार करण्याची डॉक्टरांना सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 03:21 PM2019-07-21T15:21:56+5:302019-07-21T15:29:59+5:30

एका दिवसात कमीत कमी पाच जनावरांवरील उपचार व त्याचा इतंभूत अहवाल एका डॉक्टरास रोज देण्याची सक्त केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाने केली आहे. यामुळे आता पशुधन डॉक्टराना रोज जनावराना शोधून त्यांच्यावर औषधोपचार करावाच लागणार आहे.

For the research on diseases, five doctors are required to take medicine every day | आजारांवरील संशोधनासाठी पाच जनावरांवर रोज उपचार करण्याची डॉक्टरांना सक्ती

रोज कमीत कमी पाच जनावरांवर औषधोपचार करण्याची सक्ती डॉक्टरांना करण्यात आली

Next
ठळक मुद्दे ग्रामीण, दुर्गम व शहरी जनावरे विविध आजारांनी दगावू नयेजीव घेणे आजार रोखण्यासाठी केंद्र शासनाने रोजदार मोहीमएकाच वेळी उद्भवणाऱ्या प्रादुर्भावावर तज्ज्ञ त्वरीत संशोधन

ठाणे : जनावरांना होणारे जीव घेणे आजार रोखण्यासाठी केंद्र शासनाने रोजदार मोहीम आता घेतली आहे. त्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणातील दवाखान्यात रोज कमीत कमी पाच जनावरांवर औषधोपचार करण्याची सक्ती डॉक्टरांना करण्यात आली. एवढेच नव्हे तर उपचार केलेल्या या प्रत्येक जनावराच्या उपचाराची इतंभूत माहितीचा अहवाल त्याच दिवशी केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाकडे अ‍ॅपव्दारे पाठवण्याची तंबी या डॉक्टरांवर केंद्र शासनाने केली आहे.
        ग्रामीण, दुर्गम व शहरी जनावरे विविध आजारांनी दगावू नये. आजारास अनुसरून त्यांच्यावर वेळीच औषधी उपचार होणे अपेक्षित आहे. एवढेच नव्हे तर एकाच वेळी उपचार झालेल्या जनावरांच्या आजारांची लक्षणे, त्यावरील उपचार, जनावराचे व मालकाचे आणि गावाचे नाव इत्यादी माहितीचा अहवाल या डॉक्टरांना अ‍ॅपव्दारे रोज केंद्र शासनास आता द्यावा लागणार आहे. एका दिवसात कमीत कमी पाच जनावरांवरील उपचार व त्याचा इतंभूत अहवाल एका डॉक्टरास रोज देण्याची सक्त केंद्राच्या पशुसंवर्धन विभागाने केली आहे. यामुळे आता पशुधन डॉक्टराना रोज जनावराना शोधून त्यांच्यावर औषधोपचार करावाच लागणार आहे. या सक्तीमुळे या डॉक्टरांची पॅक्टीसची गती वाढून त्यात दैनंदिन सक्रियता वाढीस लागणार आहे.
प्रत्येक दिवशी देशभरातील डॉक्टरांनी पाच जनावरांवर आजारांच्या लक्षणास अनुसरून केलेला उपचारांवर केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातील तज्ज्ञांव्दारे संशोधन केले जाईल. संबंधीत परिसरातील जनावरांनाच्या आजारांचे समान लक्षण दिसून आल्यास केंद्राच्या तज्ञांव्दारे संबंधीत डॉक्टरांना औषधोपचार करण्यचे मार्गदर्शन होईल. एवढेच नव्हे तर कोणत्या कालावधीत, हवामानात जनावरांना कोणत्या आजारास तोंड द्यावे लागते, देशाच्या वेगवेगळ्या भागातील जनावरांवर कोणत्या आजरांचा प्रादुर्भाव होतो. एकाच वेळी उद्भवणाऱ्या प्रादुर्भावावर तज्ज्ञ त्वरीत संशोधन करून त्यावरील उपाययोजनांचे सखोल मार्गदर्शन डॉक्टरांना देखील करणार आहे. यानंतर सभोतालचे जनावरे या आजारास बळी पडू नये, त्यासाठी वेळीच उपाययोजना, सखोल मार्गदर्शनही या पशूधन डॉक्टरांना केंद्राकडून अ‍ॅपव्दारे मिळणार असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक विजय धुमाळ व ठाणे जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाचे डॉ. लक्ष्मण पवार यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: For the research on diseases, five doctors are required to take medicine every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.