सायकलच्या प्रसारासाठी प्रजासत्ताकदिनी फेरी; ३२ सायकलपटू सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:51 AM2021-01-28T00:51:55+5:302021-01-28T00:52:10+5:30

देशभरात विविध ठिकाणी ७२ किलोमीटरची सायकल फेरी काढण्यात आली. यात अंबरनाथहून कर्जतपर्यंत आणि परत बदलापूरपर्यंत अशी फेरी काढली

Republic Day rounds for bicycle dissemination; 32 cyclists participated | सायकलच्या प्रसारासाठी प्रजासत्ताकदिनी फेरी; ३२ सायकलपटू सहभागी

सायकलच्या प्रसारासाठी प्रजासत्ताकदिनी फेरी; ३२ सायकलपटू सहभागी

Next

अंबरनाथ : सुदृढ आरोग्यासाठी सायकलचा वापर वाढावा, या हेतूने अंबरनाथ आणि बदलापूर सायकलिस्ट संघटनेच्या वतीने प्रजासत्ताकदिनी ७२ किलोमीटरची सायकल फेरी काढण्यात आली होती. अंबरनाथ शहरातील सहायक पोलीस आयुक्त कार्यालयापासून सुरू झालेली ही फेरी बदलापूरमधील कार्मेल शाळेजवळ समाप्त झाली. विविध वयोगटातील ३२ सायकलपटू आणि सहायक पोलीस आयुक्तही या फेरीत सहभागी झाले होते.

देशभरात विविध ठिकाणी ७२ किलोमीटरची सायकल फेरी काढण्यात आली. यात अंबरनाथहून कर्जतपर्यंत आणि परत बदलापूरपर्यंत अशी फेरी काढली. सकाळी साडेआठ वाजता सहायक पोलीस आयुक्त कार्यालयापासून या फेरीची सुरुवात झाली. अंबरनाथ सायकलिस्ट फाउंडेशन आणि बदलापूर सायकलिंग क्लबच्या वतीने या फेरीत अंबरनाथ आणि बदलापूरमधील १७ ते ६१ वयोगटातील ३२ सायकलपटू सहभागी झाले. अंबरनाथ, बदलापूर, नेरळ, कर्जत आणि पुन्हा नेरळमार्गे जाऊन बदलापूरच्या कार्मेल शाळेजवळ ही फेरी संपली. अंबरनाथचे सहायक पोलीस आयुक्त विनायक नरळे स्वतः फेरीत सहभागी झाले होते.  

Web Title: Republic Day rounds for bicycle dissemination; 32 cyclists participated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.