टीएमटीच्या तिकीटांमध्ये भाडेवाढ नसल्याने ठाणेकरांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 10:26 PM2020-02-18T22:26:42+5:302020-02-18T22:33:03+5:30

आगामी वर्षात ठाणे परिवहनच्या प्रवाशांना अधिकाधिक बसेसच्या फेऱ्या देऊन चांगल्या सुविधांवर भर देण्याबरोबरच कोणतीही भाडेवाढ नसलेला अर्थसंकल्प प्रशासनाने परिवहन समितीकडे सादर केला आहे. २०२०- २०२१ या आर्थिक वर्षासाठी ४३८ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्प परिवहन व्यवस्थापक संदीप माळवी यांनी सादर केला.

Relief to Thanekar as there is no hike in TMT tickets | टीएमटीच्या तिकीटांमध्ये भाडेवाढ नसल्याने ठाणेकरांना दिलासा

ठाणे महापालिकेकडे केली २९१ कोटींची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्दे २०२०-२१ अर्थसंकल्प ४३८ कोटी ८६ लाखांचा : प्रशासनाने परिवहन समितीला सादरठाणे महापालिकेकडे केली २९१ कोटींची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी परिवहनच्या तिकीटदरात वाढ आवश्यक असल्याचे स्पष्ट केल्यानंतरही मंगळवारी सादर केलेल्या ठाणे परिवहन सेवेच्या अर्थसंकल्पात मात्र प्रशासनाने कोणतीही भाडेवाढ सुचविलेली नाही.
मंगळवारी २०२०-२०२१ चा ४३८ कोटी ८६ लाखांचा अर्थसंकल्प परिवहन प्रशासनाने परिवहन समितीला सादर केला. गतवर्षी वर्षी ४७६.१२ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. यंदा मात्र तो ३७ कोटींनी कमी झाला आहे . विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात ठाणे महापालिकेकडून ३५० कोटी अनुदानाची मागणी करणा-या परिवहन प्रशासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात ६० कोटी कमी करून २९१ कोटींचीच मागणी केली आहे. बसची संख्या आणि प्रवाशांची संख्या वाढवण्यावर या अर्थसंकल्पात भर दिला आहे .
गेल्या दोन वर्षांपासून परिवहनच्या तिकीटदरात वाढ करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून तांत्रिक कारणांमुळे प्रशासनाला ही दरवाढ करणे शक्य झालेले नाही. मात्र, २० फेब्रुवारी रोजी होणाºया महासभेत तिकीटदरवाढीचा प्रस्ताव आणला असल्याने परिवहनच्या अर्थसंकल्पातदेखील ती करण्यात येईल, असे अपेक्षित होते. परंतु, दरवाढीला आधीच विरोध झाल्याने अर्थसंकल्पात ती केलेली नाही.
परिवहनच्या बहुतांश बसचे आयुर्मान संपले असल्याने त्या बदली करण्याची आवश्यकता आहे . मोठ्याप्रमाणात बस बंद करणे शक्य नसल्याने आधी त्यांची संख्या वाढविण्याचे नियोजन या अर्थसंकल्पात केले आहे . त्यानंतर टप्प्याटप्याने आयुर्मान संपलेल्या बस बंद करणार आहेत. पालिकेच्या २७७ पैकी केवळ सरासरी ११० बस रस्त्यावर धावत आहेत. १९० बस या जीसीसी तत्वावर आहेत. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात नादुरु स्त असलेल्या १६० पैकी सीएनजीच्या १०३ बस एएमसी तत्वावर दुरु स्त करून त्या चालविण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. तर उर्वरित ६० बस भंगारात दिल्या जाणार आहेत.
महिलांसाठी ५० तेजस्विनी पैकी ३० बसेस दाखल झाल्या असून २० बसेस मार्चपर्यं दाखल होतील. तर जूनपर्यंत ५० मिडी आणि ५० मिडी बसेस परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यामध्ये ५० मिडी बसेसची मागणी असली तरी त्याऐवजी १०० मिनी बस खरेदी केल्या जाणार आहेत. ४०० ते ४५० बस दैनंदिन संचलनासाठी उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे .

Web Title: Relief to Thanekar as there is no hike in TMT tickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.