ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात विद्यार्थीनींनी साजरे केले रक्षाबंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 10:41 PM2019-08-15T22:41:56+5:302019-08-15T22:47:03+5:30

अहोरात्र जनतेच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांचे आभार मानत त्यांच्या प्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करुन ठाणे ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. संजयकुमार पाटील यांच्यासह सुमार ६५ पोलीस अधिकारी कर्मचारी यांना एसएनडीटीच्या विद्यार्थींनींनी राख्या बांधून ठाण्याचे रक्षाबंधन साजरे केले.

Raksha Bandhan celebrated by students at Thane Rural Police Headquarters | ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात विद्यार्थीनींनी साजरे केले रक्षाबंधन

एसएनडीच्या विद्यार्थींनींनी पोलिसांना बांधल्या राख्या

googlenewsNext
ठळक मुद्देएसएनडीच्या विद्यार्थींनींनी पोलिसांना बांधल्या राख्याअहोरात्र जनतेच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या पोलिसांचे मानले आभार व्यक्त केली कृतज्ञतेची भावना

ठाणे : ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात एसएनडीटी महिला, मुंबई विद्यापीठाच्या वतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम राबविण्यात आला. अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांना एसएनडीटीच्या आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या संचालिका डॉ. आशा पाटील यांनी राखी बांधली. यावेळी ६५ अधिकारी कर्मचारी यांना एसएनडीटीच्या दहा विद्यार्थींनींनी राख्या बांधल्या. जनतेसाठी पोलीस हे अहोरात्र सेवा देत असतात. तरीही त्यांना नेहमीच टीकेला सामोरे जावे लागते. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नेहमीच तत्पर सेवा देणाऱ्या पोलीस बांधवांना राखी पोर्णिमेनिमित्त डॉ. आशा पाटील, प्रा. अमय महाजन आणि प्रा. अंशित बक्षी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थीनींनी राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले. कुलगुरु प्रा. शशीकला वंजारी आणि निबंधक डॉ. दीपक देशपांडे यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले.
.............

Web Title: Raksha Bandhan celebrated by students at Thane Rural Police Headquarters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.