Rajan Vichare will complete the incomplete project | अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार- राजन विचारे
अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार- राजन विचारे

विकासकामे केलेली आहेत, त्यांची पोचपावती मतदारांनी दिलेली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत जनतेचा विश्वास संपादन करून त्यांच्या विश्वासाला कोणत्याही स्वरूपाचा तडा न जाऊ देता, विकासकामे करणार आहे. यामध्ये ठाण्यासह नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदरमध्ये जे काही प्रकल्प मंजूर झाले आहेत किंवा जे काही प्रकल्प सुरूहोणार आहेत, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

केंद्रात मोदी सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून आणि ठाणे, मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबई महापालिकांच्या माध्यमातून जी काही विकासकामे करायची आहेत, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मीरा-भार्इंदरमधील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पावले उचलणार आहे. सीआरझेडचा प्रश्न मागील कित्येक वर्षे प्रलंबित आहे, तो सोडवला जाईल. ठाण्यातील प्रस्तावित नवीन रेल्वेस्टेशन, पूर्वेतील सॅटीस, कोपरी पुलाचे रखडलेले काम, मेट्रोचे काम आदींसह इतर महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवाय, नवी मुंबईतील एलिव्हेटेड प्रकल्प असतील किंवा जे काही इतर प्रकल्प असतील, ते मार्गी लावले जाणार आहेत. जनतेने जो काही विश्वास दाखवला आहे, पक्षाने जो काही विश्वास दाखवून पुन्हा उमेदवारी दिली, त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही. पाच वर्षांत केलेल्या कामांची पोचपावती मतदारांनी दिली आहे. केलेल्या विकासकामांमुळेच मतदारांनी मला विजयी केले आहे. शिवाय, पक्षातील प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा हा विजय आहे. पुढील पाच वर्षांत पुन्हा विकासकामे केली जातील.


Web Title:  Rajan Vichare will complete the incomplete project
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.