पालघरमध्ये पावसाचे थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 12:55 AM2020-09-24T00:55:07+5:302020-09-24T00:55:20+5:30

वाहतूककोंडीसह जनजीवन विस्कळीत : वसई-विरारमध्ये सखल भागात साचले पाणी

Rain showers in Palghar | पालघरमध्ये पावसाचे थैमान

पालघरमध्ये पावसाचे थैमान

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : मंगळवार रात्रीपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसाने पालघर जिल्ह्यात अनेक भागांत चांगलाच धुमाकूळ घातला. रात्रभर सुरू असलेला पाऊस बुधवारी दिवसभरही कोसळतच होता. या पावसाने जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. तसेच सखल भाग पाण्याखाली गेलेले दिसले. धरण क्षेत्रांतही चांगला पाऊस झाल्याने पिण्याच्या पाण्याची चिंता मिटण्यास बऱ्यापैकी मदत झाली असली, तरी ग्रामीण भागात मात्र शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
नालासोपारा शहरात पाणी साचल्याने सखल भागातील जनजीवन विस्कळीत झाले होते. मंगळवारी सायंकाळपासून ते बुधवारी सकाळी या दिवसभरात मांडवीत ३० मिलिमीटर, आगाशी १३७ मिलिमीटर, निर्मळ १५६ मिलिमीटर, विरार ६६ मिलिमीटर, माणिकपूर १५१ मिलिमीटर, तर वसईत सर्वात जास्त १८२ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत २६३९ मिलिमीटर पाऊस वसई तालुक्यात पडला आहे.
रात्री ८ वाजल्यापासून कोसळणाºया पावसामुळे नालासोपारा शहराच्या पूर्वेकडील तुळिंज, सेंट्रल पार्क , विजय नगर, ओस्तवाल नगर, अलकापुरी, गाला नगर, टाकी रोड, प्रगती नगर, महेश पार्क या ठिकाणी पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तर संतोष भवन, बिलालपाडा, धनिवबाग, श्रीराम नगर या विभागातील सखल भागातही पाणी साचले होते. काही रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहने बंद पडून वाहतूक कोंडी झाली होती. मात्र पावसाचा जोर कमी झाल्यावर शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्वपदावर आली.
मंगळवारपासून सुरू झालेला जोरदार पाऊस बुधवारीही कोसळतच होता. तालुक्यात १२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणक्षेत्रांतदेखील समाधानकारक पाऊस झाल्याने वसईकरांची पाण्याची चिंता मिटण्यास मदत होणार आहे. रात्रीच्या सुमारास बरसलेल्या मुसळधार पावसामुळे नालासोपारा, राष्ट्रीय महामार्ग, वसई पश्चिम व पूर्व भागात तसेच विरार परिसरातील सखल भागात पाणी साचले होते. परिणामी नागरी जीवन विस्कळीत झाले.
अर्नाळ्यामध्ये घरांचे नुकसान
च्विरार पश्चिमेतील अर्नाळा येथे परतीच्या पावसाबरोबरच आलेल्या चक्रीवादळामुळे येथील स्थानिक रहिवासी आनंद बरबोज यांच्या म्हशींच्या तबेल्याचे नुकसान झाले आहे.
च्तबेल्यावरील १०० ते १२५ पत्रे पूर्णपणे तुटून खाली रस्त्यावर पडल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
च् तसेच अर्नाळा येथील काही घरांचेही नुकसान झाले असून भिंतीला भेगा पडल्या आहेत. मोठी झाडे घरावर पडली आहेत.

Web Title: Rain showers in Palghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.