पुष्पा राजवानी यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:26 AM2021-06-21T04:26:05+5:302021-06-21T04:26:05+5:30

------------------- दुकानात चोरी उल्हासनगर : शिवाजी चौकातील महालक्ष्मी दुकानात गुरुवारी रात्री चोरी झाली असून, अनोळखी व्यक्तीने २ एलईडी टीव्ही ...

Pushpa Rajwani passed away | पुष्पा राजवानी यांचे निधन

पुष्पा राजवानी यांचे निधन

Next

-------------------

दुकानात चोरी

उल्हासनगर : शिवाजी चौकातील महालक्ष्मी दुकानात गुरुवारी रात्री चोरी झाली असून, अनोळखी व्यक्तीने २ एलईडी टीव्ही व एक मोबाइल असा एकूण ४३ हजारांचा ऐवज लंपास केला. दुकानात काम करणारी पूजा वसंतांनी यांच्या फिर्यादीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.

----------------------

दागिने केले लंपास

उल्हासनगर : कॅम्प नं. ४ मद्रासीपाडा येथे राहणाऱ्या कलावती कोणार या शनिवारी सकाळी घराला कडी लावून बाहेर गेल्या होत्या. चोरट्याने ही संधी साधून घराची कडी उघडून लोखंडी कपाटातून २ लाख ५४ हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

----------------------------

धूम स्टाइलने चेनची चोरी

उल्हासनगर : कॅम्प नं. ५ परिसरात राहणाऱ्या राखी श्यामदासानी शनिवारी रात्री साडेअकरा वाजता नवीन पोस्ट ऑफिससमोरील रस्त्याने चालत होत्या. त्यावेळी धूम स्टाइलने दुचाकीवरून आलेल्या दोनपैकी एका तरुणाने मुलीच्या गळ्यातील ३५ हजार किमतीची सोन्याची चेन खेचून पळ काढला. याप्रकरणी हिललाइन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.त

Web Title: Pushpa Rajwani passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.