JNU Attack : जेएनयू येथील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 09:17 PM2020-01-06T21:17:03+5:302020-01-06T21:18:30+5:30

आम्हाला शहरात सुरक्षित वाटत नसल्याचे मत उपस्थित विद्यार्थ्यांनी मांडले.

Protest against Attack on students of JNU | JNU Attack : जेएनयू येथील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध

JNU Attack : जेएनयू येथील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध

googlenewsNext
ठळक मुद्देआम्हाला शहरात सुरक्षित वाटत नसल्याचे मत उपस्थित विद्यार्थ्यांनी मांडले.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संविधान बचाव समिती, कल्याणच्या माध्यमातून सोमवारी सायंकाळी निदर्शने करण्यात आली.

कल्याण - जवाहरलाल नेहरु विद्यापीठमध्ये (जेएनयू) विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संविधान बचाव समिती, कल्याणच्या माध्यमातून सोमवारी सायंकाळी निदर्शने करण्यात आली. यावेळी, जेएनयू विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी नागरिकांची स्वाक्षरी मोहीम तसेच मेणबत्त्या लावण्यात आल्या.

शनिवारी रात्री जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला होता. त्यामध्ये अनेक विद्यार्थी तसेच प्राध्यापकही जखमी झाले आहेत. रात्रीच्या वेळी अशाप्रकारच्या घटनेचा निषेध करत सरकार त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे, आम्हाला शहरात सुरक्षित वाटत नसल्याचे मत उपस्थित विद्यार्थ्यांनी मांडले.

यावेळी, प्रकाश मुथा, नवीन सिंग, महादेव रायभोळे, उमेश बोरगांवकर, दलित मित्र अण्णा रोकडे, नोवेल साळवे, आजम शेख, इफ्फतेखार खान, प्रशांत तोशणेवाल, रमीझ मजीद, गफ्फार शेख उपस्थित होते.

Web Title: Protest against Attack on students of JNU

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.