बसच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:40 AM2021-05-14T04:40:10+5:302021-05-14T04:40:10+5:30

ठाणे : एका खासगी बसच्या धडकेमध्ये दुधनाथ रामप्रकाश जैस्वाल (४८, रा. गांधीनगर, ठाणे) हे पादचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी ...

Pedestrian seriously injured in bus collision | बसच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

बसच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी

Next

ठाणे : एका खासगी बसच्या धडकेमध्ये दुधनाथ रामप्रकाश जैस्वाल (४८, रा. गांधीनगर, ठाणे) हे पादचारी जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी अज्ञात बसचालकाविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दुधनाथ हे घोडबंदर रोडने कासारवडवली बसस्टॉप जवळून १२ मे रोजी सकाळी ८.२० वाजण्याच्या सुमारास पायी जात होते. त्याचवेळी वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत निष्काळजीपणे चालकाने बस मागे घेतल्याने दुधनाथ यांना धडक बसली. यात ते खाली कोसळले. या अपघातामध्ये त्यांचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला. तर डाव्या पायाला मार लागला. त्यांना उपचारासाठी कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, अज्ञात बसचालकाविरुद्ध मोटर वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एच. चौगुले या अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Pedestrian seriously injured in bus collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.