ठाण्यात टँकरच्या धडकेमध्ये पादचाऱ्याचा मृत्यू : चालकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 10:42 PM2020-02-17T22:42:58+5:302020-02-17T22:47:01+5:30

मुंबई ठाणे या पूर्व द्रूतगती मार्गावर टँकरच्या धडकेमध्ये विलास पाईकराव या ४० वर्षीय पादचाºयाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या मार्गावरील वाढत्या अपघातांमुळे चिंता व्यक्त होत आहे.

Pedestrian dies in tanker collision in Thane: driver arrested | ठाण्यात टँकरच्या धडकेमध्ये पादचाऱ्याचा मृत्यू : चालकास अटक

अपघातांमधील वाढत्या मृत्यूमुळे चिंता

Next
ठळक मुद्देअपघातांमधील वाढत्या मृत्यूमुळे चिंता ठाणे मुंबई पूर्व द्रूतगती महामार्गावर वाहतूककोंडी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : टँकरच्या धडकेमध्ये विलास मारुती पाईकराव (४०) या पादचाºयाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी टँकरचालक धीरेंद्र कुमार सिंग (३१, रा. कासारवडवली, ठाणे) याला अटक करून त्याचा टँकरही पोलिसांनी जप्त केला.
घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट येथून तुर्फेपाडा येथे जाणाºया मार्गावर १६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास धीरेंद्र याच्या टँकरने तिथून जाणारे पादचारी पाईकराव यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये डोक्याला आणि पाठीला मार लागल्याने पाईकराव हा मजूर गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर त्याचा मृतदेह पोलिसांनी नातेवाइकांच्या स्वाधीन केल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी चालक धीरेंद्र याच्याविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात बेदरकारपणे वाहन चालविणे तसेच मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*दोन आठवड्यांत चौघांचा मृत्यू
अपघातानंतर घोडबंदर रोडवर रविवारी रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. कासारवडवली वाहतूक शाखेने अपघातग्रस्त टँकर हटविल्यानंतर ती सुरळीत झाली. अवघ्या दोन आठवड्यांमध्ये या मार्गावर तीन ते चार जणांचा मृत्यू झाल्याने या मार्गावर वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची तसेच लेन कटिंग आणि बेदरकारपणे वाहने हाकणा-या चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस.एस. केसरे हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Pedestrian dies in tanker collision in Thane: driver arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.