थकीत बिले द्या, अन्यथा जगणेही अवघड, ठाण्यातील दीडशे ठेकेदारांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 10:08 PM2021-09-24T22:08:57+5:302021-09-24T22:10:12+5:30

Thane News: एकीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकृष्ट दर्जाची कामे करणा:या ठेकेदारांना काळया यादीत टाकण्याचा इशारा दिला असतांनाच कामे करूनही गेली दोन वर्ष ठेकेदारांची बिले काढलेली नसल्याने शुक्र वारी सुमारे १५० ठेकेदारांनी पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांची भेट घेतली.

Pay overdue bills, otherwise it is difficult to live, 150 contractors from Thane meet Municipal Commissioner | थकीत बिले द्या, अन्यथा जगणेही अवघड, ठाण्यातील दीडशे ठेकेदारांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

थकीत बिले द्या, अन्यथा जगणेही अवघड, ठाण्यातील दीडशे ठेकेदारांनी घेतली पालिका आयुक्तांची भेट

Next

 ठाणे - एकीकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकृष्ट दर्जाची कामे करणा:या ठेकेदारांना काळया यादीत टाकण्याचा इशारा दिला असतांनाच कामे करूनही गेली दोन वर्ष ठेकेदारांची बिले काढलेली नसल्याने शुक्र वारी सुमारे १५० ठेकेदारांनी पालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांची भेट घेतली. जवळपास ८०० कोटींची बिले थकली असून किमान जुनी थकबाकी तरी मिळावी, अशी मागणी सर्व ठेकेदारांनी आयुक्तांना केली आहे. आता बिले निघाली नाहीतर जगणे देखील मुश्किल होईल, अशी विवंचना ठेकेदारांनी व्यक्त केली आहे.

ठाणे महापालिकेची आर्थिक परिस्थिती सध्या फारशी चांगली नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून बिले काढण्यात येत नाही. केवळ अत्यावश्यक कामांची बिले काढण्यात येत आहेत. ठाणो पालिका क्षेत्नात अनेक महत्वाची कामे ही ठेकेदारांच्या माध्यमातून करण्यात येतात. गेल्या दोन वर्षात या ठेकेदारांनी अनेक कामे पूर्ण केली आहेत मात्न केलेल्या कामांचे बिल अद्याप अदा केलेले नाही. कोरोना काळात सर्वच विभागाच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याने ही बिले अदा केलेले नाहीत, असे पालिका प्रशासनाने म्हणणो आहे. थकीत बिले मिळावी यासाठी काही दिवसांपूर्वीच ठेकेदारांनी आंदोलन करून काम बंद करण्याचा इशारा दिला होता. मात्र तरीही पालिकेकडून प्रतिसाद मिळाला नाही. अखेर शुक्रवारी या ठेकेदारांनी एकत्र येऊन पालिका आयुक्त शर्मा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे आपली कैफियत मांडली. यासंदर्भात त्यांनी निवेदन देखील दिल्याची माहिती सूत्रानी दिली.

Web Title: Pay overdue bills, otherwise it is difficult to live, 150 contractors from Thane meet Municipal Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.