अन्यथा कडक कारवाई; ४०५ हॉटेल, बार, मंगल कार्यालय, मॉल्सवाल्यांना पोलिसांनी बजावल्या नोटीसा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 06:13 PM2021-02-19T18:13:45+5:302021-02-19T18:13:45+5:30

Police Issued Notices : या नोटीसीद्वारे प्रत्येक आस्थापनाने सोशल डिस्टेसींगचे पालन करावे, सॅनीटायझरचा वापर करावा, गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, स्क्रीनींग करण्यात यावे आदींच्या महत्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

Otherwise strict action; Police issued notices to 405 hotels, bars, mangal offices and malls | अन्यथा कडक कारवाई; ४०५ हॉटेल, बार, मंगल कार्यालय, मॉल्सवाल्यांना पोलिसांनी बजावल्या नोटीसा

अन्यथा कडक कारवाई; ४०५ हॉटेल, बार, मंगल कार्यालय, मॉल्सवाल्यांना पोलिसांनी बजावल्या नोटीसा

Next
ठळक मुद्देया सुचनांचे पालन न केल्यास संबधींत आस्थापनांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ठाणे  : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून ठाणे  पोलिसांच्या वतीने शहरातील ४०५ हॉटेल, बार, ढाबे, पब, मॉल्स आदींना नोटीसा बजावण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी दिली. या नोटीसीद्वारे सोशल डिस्टेसींगचे पालन करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कोरोना बाबतीत जे काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्याचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला.


कोरोना रुग्णांची वाढत असलेली संख्या नजरेसमोर ठेवून करण्यात येत असलेल्या उपाय योजनांची माहिती देण्यासाठी महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे देखील उपस्थित होते. यावेळी पालिका आणि पोलिसांच्या मदतीने कोरोना रोखण्यासाठी महत्वाचे पावले उचलण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शहरातील गर्दीच्या १०५ ठिकाणांवर भोंग्याद्वारे सुचना दिल्या जात असून सोशल डिस्टेंसींगचे पालन करणो, स्क्रीनींग करणो, सॅनीटायझरचा वापर करण्याबरोबर मास्कचा वापर करण्याचे आवाहन या माध्यमातून केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय मास्क वापर न करणा:यांच्या विरोधात दंडाची मोहीम हाती घेण्यात आली असून तशा सुचना वाहतुक पोलिसांना देण्यात आल्या आहेत. याशिवाय सध्या हॉटेल, बार, रेस्टॉरेन्ट, मॉल, मोठी दुकाने, मंगल कार्यालये, पब, ढाबे आदी ठिकाणी सोशल डिस्टेसींगचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या ४०५ आस्थापनांना १४९ अन्वये नोटीसा बजावण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. या नोटीसीद्वारे प्रत्येक आस्थापनाने सोशल डिस्टेसींगचे पालन करावे, सॅनीटायझरचा वापर करावा, गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, स्क्रीनींग करण्यात यावे आदींच्या महत्वाच्या सुचना देण्यात आल्या आहेत.


परंतु या सुचनांचे पालन न केल्यास संबधींत आस्थापनांवर नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दुसरीकडे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी देखील मंगल कार्यालये किंवा मॉल्स, हॉटेल, बार आदी ठिकाणी गर्दी होत असल्याचे सांगितले आहे. परंतु पोलिसांनी बजावलेल्या नोटीसांनुसार त्या आस्थापनांनी नियमांचे पालन केले नाही तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याबरोबर त्या आस्थापना सील केल्या जाणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच वेळ प्रसंगी त्यांचे लायसन्स देखील रद्द केले जाईल असा इशाराही दिला.

Web Title: Otherwise strict action; Police issued notices to 405 hotels, bars, mangal offices and malls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.