पावसाचं आगमन होताच मीरा भाईंदरमध्ये शेतीच्या कामांना सुरुवात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 03:48 PM2020-06-04T15:48:09+5:302020-06-04T15:48:20+5:30

पारंपरिक शेती व्यवसाय मीरा - भाईंदर सारख्या शहरातून जवळपास नामशेष झाला आहे . 

With the onset of rains, farming activities started in Mira Bhayandar | पावसाचं आगमन होताच मीरा भाईंदरमध्ये शेतीच्या कामांना सुरुवात 

पावसाचं आगमन होताच मीरा भाईंदरमध्ये शेतीच्या कामांना सुरुवात 

googlenewsNext

मीरारोड -  चक्रीवादळा मुळे पावसाला सुरवात झाल्याने मीरा भाईंदर मध्ये शेतकऱ्यांनी भातपीका साठी शेतीकामे सुरु केली आहेत. नांगरणी , पेरणी आदी कामे बळीराजाने हाती घेतली आहेत . 

मीरा भाईंदरमध्ये सिमेंट- काँक्रीट चे जंगल प्रचंड वेगाने वाढले आहे . शहरीकरणा मुळे शेतजमीनींना सोन्याचा भाव आल्याने शेत जमिनींची वारेमाप विक्री केली गेली आहे . त्यामुळे  पारंपरिक शेती व्यवसाय मीरा - भाईंदर सारख्या शहरातून जवळपास नामशेष झाला आहे . 

वारेमाप झालेली बांधकामे , बेकायदा चालणारा डेब्रिस, दगड , मातीचा अवास्तव भरावा या मुळे पाण्याचा निचरा  होणे बंद झाल्याने मुर्धा , राई , मोरवा , डोंगरी , उत्तन , पाली , चेणे भागातच थोडीफार शेती शिल्लक राहली आहे . शेतीकामा साठी मजूर मिळत नाहीत आणि पुरेसे उत्पन्न देखील निघत नाही . जमिनीचे कौटुंबिक वाद तर वेगळेच. परंतु या सर्व जंजाळात आजही काहींनी आपली शेती जिद्दीने टिकवून ठेवली आहे . चक्रीवादळा मुळे पावसाला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांनी नांगरणी , पेरणी आदी कामे सुरु केली आहेत . यंदा पाऊस लवकर सुरु झाल्याने वेळीच शेतीची कामे पूर्ण होऊन चांगले पीक हाती येईल अशी आशा या शेतकऱ्यांना वाटत आहे

Web Title: With the onset of rains, farming activities started in Mira Bhayandar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.