ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १२८७ रुग्णांची नव्याने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 01:21 AM2020-08-06T01:21:56+5:302020-08-06T01:22:23+5:30

४१ जणांचा मृत्यू : आरोग्य विभागाची माहिती

New increase of 1287 corona patients in Thane district | ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १२८७ रुग्णांची नव्याने वाढ

ठाणे जिल्ह्यात कोरोनाच्या १२८७ रुग्णांची नव्याने वाढ

Next

ठाणे : जिल्ह्यात कोरोनाच्या एक हजार नव्या २८७ रुग्णांची बुधवारी वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संंख्या ९२ हजार ३८९ झाली आहे. तर ४१ रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे मृतांची संख्या दोन हजार ५५७ झाली.ठाणे महापालिका क्षेत्रात बुधवारी कोरोनाचे २७० रुग्ण नव्याने आढळले असून शहरातील रुग्ण संख्या २० हजार ४२१ वर गेली. तर आठ जणांच्या मृत्यूमुळे मृतांचा आकडा ६७३ वर गेला. कल्याण-डोंबिवली परिसरात २३७ रुग्णांची बुधवारी वाढ झाली असून नऊ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यामुळे येथे आतापर्यंत २१ हजार ३९८ रुग्ण बाधीत झाले आहेत. तर मृतांची संख्या ४०७ झाली आहे.नवी मुंबईत २८७ रुग्णांची तर चार जणांच्या मृत्यूची नोंद झाली. येथे आतापर्यंत बाधितांची संख्या १६ हजार ९५७ झाली असून मृतांची संख्या ४४१ वर गेली आहे. उल्हासनगरात बुधवारी दोन जणांचा मृत्यू झाला असून ३१ नवे रुग्ण आढळले. यामुळे येथे मृतांची संख्या १४७ तर सात हजार १९ बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे.

भिवंडी महापालिका क्षेत्रात बुधवारी १८ बाधित आढळले असून तीन मृत्यूची नोंद झाली. यामुळे बाधितांची संख्या तीन हजार ७०३ तर मृतांची २११ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १३२ रुग्णांसह तीन जणंच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. या शहरात आता बाधितांची संख्या आठ हजार ९५६ झाल तर मृतांची संख्या २९१ झाली आहे. अंबरनाथमध्ये बुधवारी ८० रुग्णांची वाढ झाली असून, दोन जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

बदलापूरमध्ये ४९ रुग्ण
च्बदलापूरमध्ये ४९ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार ८५५ झाली. या शहरात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मृत्यूची संख्या ५१ आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात ९२ रुग्णांची वाढ झाली तर चार मृत्यू झाले आहेत.

Web Title: New increase of 1287 corona patients in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.