ठाणे महापौरपदी नरेश म्हस्के, उपमहापौरपदी पल्लवी कदम यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 12:13 PM2019-11-21T12:13:33+5:302019-11-21T12:13:42+5:30

महापौर आणि उपमहापौरपदासाठी बिनविरोध म्हणून नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांची सेनेकडून निवड झाली

Naresh Mhaske, Mayor of Thane, Pallavi Kadam elected Deputy Mayor | ठाणे महापौरपदी नरेश म्हस्के, उपमहापौरपदी पल्लवी कदम यांची बिनविरोध निवड

ठाणे महापौरपदी नरेश म्हस्के, उपमहापौरपदी पल्लवी कदम यांची बिनविरोध निवड

googlenewsNext

ठाणे - महापौर आणि उपमहापौरपदासाठी बिनविरोध म्हणून नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांची सेनेकडून निवड झाली असून, आज दुपारी 1 नंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे ठाणे महापालिकेत येणार आहेत. तसेच इतर सेना नेते देखील उपस्थित असणार आहेत. राज्यात बदललेलं सत्ता समीकरण पाहता ठाण्यात महाआघाडीचा महापौर होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे ठाणे मनपामध्ये शिवसेनेविरुद्ध कोणत्याच पक्षाने महापौर व उपमहापौरपदाकरता अर्ज भरला नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच चालू आहे, त्यामुळे खालच्या पातळीवर हायकमांड काय ठरवतील, असे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ठाण्यात सेनेची एक हाती सत्ता आहे. तसेच आज ठाण्यात महापौर आणि उपमहापौरपदाची माळ गळ्यात पडली आहे, यासाठी ठाणे महापालिकेच्या आवारात मोठ्या प्रमाणात सजावट करत पोस्टरबाजी देखील करण्यात आली आहे.

Web Title: Naresh Mhaske, Mayor of Thane, Pallavi Kadam elected Deputy Mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.