भाईंदरमधील मतदार यादीत प्रभागात राहत नसलेल्यांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 07:41 AM2021-11-28T07:41:47+5:302021-11-28T07:42:13+5:30

Mira-Bhayander News: मीरा भाईंदरमध्ये मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम सुरू असून, भाईंदर पूर्वेच्या प्रभाग तीनमध्ये प्रभागात राहत नसणाऱ्या अनेकांची नावे आणि मतदार ओळखपत्रे आली आहेत. मृत व्यक्ती आणि तेथे राहत नसलेल्यांनी नावे कमी झालेली नाहीत. या गैरप्रकारामागे काही राजकारणी आणि संबंधित अधिकारी यांचे संगनमत असल्याचा आरोप शिवसेना गटनेत्या नीलम ढवण यांनी केला.

Names of non-residents in the constituency in the voter list in Bhayander | भाईंदरमधील मतदार यादीत प्रभागात राहत नसलेल्यांची नावे

भाईंदरमधील मतदार यादीत प्रभागात राहत नसलेल्यांची नावे

Next

मीरारोड : मीरा भाईंदरमध्ये मतदार याद्यांच्या पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम सुरू असून, भाईंदर पूर्वेच्या प्रभाग तीनमध्ये प्रभागात राहत नसणाऱ्या अनेकांची नावे आणि मतदार ओळखपत्रे आली आहेत. मृत व्यक्ती आणि तेथे राहत नसलेल्यांनी नावे कमी झालेली नाहीत. या गैरप्रकारामागे काही राजकारणी आणि संबंधित अधिकारी यांचे संगनमत असल्याचा आरोप शिवसेना गटनेत्या नीलम ढवण यांनी केला.

ढवण म्हणाल्या की, त्यांच्या प्रभाग क्र. तीनमधील मतदार यादी क्र. ११, १८, ३० मध्ये प्रभागात राहत नसलेल्या मतदारांची मोठ्या संख्येने नोंद झाली आहे. तसेच मतदार ओळखपत्रे सुद्धा आली आहेत . वास्तविक हे लोक प्रभागात राहत नाहीत. अनेकांचे तर पत्ते परिपूर्ण नाहीत . काहीजण संगनमत करून स्वतः भरलेले मतदारांचे अर्ज मोठ्या संख्येने नोंदणीसाठी सादर करतात आणि त्याची पडताळणी न करताच नावे मतदार यादीत नोंदवली जातात. बऱ्याच मतदार यादीमधील नावे तर ऐनवेळी काढली जातात. काही मतदार याद्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचे दिसून येत आहे.

मृत व घर बदलून २५ वर्षे झालेल्यांची नावेही यादीतून वगळलेली नाहीत. अशा नावांचा वापर बोगस मतदानाकरिता केला जातो. मतदार याद्या परिपूर्ण आणि गैरप्रकारमुक्त असायला हव्यात. त्यासाठी पुरेसा वेळ असताना बीएलओने प्रत्येक घरी जाऊन सध्या राहणार नागरिकांची पडताळणी व नोंद केली पाहिजे. परंतु प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही, असा आरोप ढवण यांनी केला आहे. जे राहत नाहीत तसेच मयत आहेत त्यांची नावे यादीतून त्वरित काढून टाकून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली. 

Web Title: Names of non-residents in the constituency in the voter list in Bhayander

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.