Murderous | रक्ताने मळवट भरून प्रेयसीची केली हत्या
रक्ताने मळवट भरून प्रेयसीची केली हत्या

कल्याण : उत्तर प्रदेशमधील आजमगढ येथे राहणारा अरुणकुमार गुप्ता मुंबईतील आपली पे्रयसी प्रतिमा प्रसाद हिला भेटायला कल्याणमध्ये आला होता. फेसबुकवरून झालेल्या ओळखीतून त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते. कल्याणमधील एका गेस्टहाउसमध्ये दोघांची भेट झाली. तेथे अरुणकुमारने आपला अंगठा कापून प्रतिमाचा मळवट भरला आणि काही क्षणांत तिची हत्या करून गळफास घेऊन स्वत:लाही संपवल्याची घटना कल्याणात शुक्रवारी रात्री उघडकीस आली.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या नीलम गेस्टहाउसमध्ये अरुणकुमार (२०) थांबला होता. त्याला भेटण्यासाठी तेथे प्रतिमा (१९) आली होती. रात्री ९ च्या सुमारास वेटरने त्यांच्या रूमचा दरवाजा ठोठावला; मात्र कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ झाल्यानंतर वेटरला संशय आला. त्याने ही बाब व्यवस्थापकाला सांगितली असता त्यांनी महात्मा फुले चौक पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा उघडला असता प्रतिमा मृतावस्थेत, तर अरुणकुमार गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी दोघांचे मृतदेह त्यांच्या नातेवाइकांच्या ताब्यात दिले.

बनारस येथे फिरायला जात असल्याचे वडिलांना सांगून १८ तारखेला घराबाहेर पडलेल्या अरुणने कल्याण गाठले. तर, घाटकोपर येथील एका मॉलमध्ये काम करणाऱ्या प्रतिमाने आपल्याला काम असल्याचे सांगत नीलम गेस्टहाउस गाठले. तेथे अरुणने स्वत:चा अंगठा कापून आपले रक्त प्रतिमाच्या कपाळाला लावले. त्यानंतर, तिची हत्या करत स्वत: आत्महत्या केल्याची माहिती कल्याणचे सहायक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली. एकमेकांवर प्रेम करणाºया या दोघांमध्ये अचानक असे काय घडले की, अरुणने प्रतिमाची हत्या करत स्वत: आत्महत्या केली, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

फेसबुकवर झाली होती मैत्री
उत्तर प्रदेश येथील आजमगढ येथे राहणारा अरु णकुमार आणि मुंबईतील घाटकोपर येथे राहणारी प्रतिमा यांची फेसबुकवर मैत्री झाली. काही महिन्यांत मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.


Web Title: Murderous
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.