कोचिंग क्लासेस संचालक संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 03:53 PM2020-06-29T15:53:11+5:302020-06-29T15:53:19+5:30

महाराष्ट्रातून पत्र मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना पाठविण्यात आली आहेत.

Movement for various demands on behalf of the Coaching Classes Directors Association Maharashtra State | कोचिंग क्लासेस संचालक संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन

कोचिंग क्लासेस संचालक संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने विविध मागण्यांसाठी आंदोलन

Next

ठाणे : आज कोचिंग क्लासेस संचालक संघटना महाराष्ट्र राज्यच्या वतीने क्लासेस संचालकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले. कोविड-१९ मुळे ३/४ महिने क्लासेस बंद आहेत.सर्वसामान्य क्लासेस संचालकांचे भरपूर नुकसान झाले आहे आणि त्यांच्यावर उपासमारीची,आत्महत्येची वेळ आली आहे. तसेच क्लासेस साठी भाड्याने घेतलेल्या गाळ्याचे भाडे थकले आहे ,घरात राशन नाही,बरेच क्लासेस बंद झाले आहेत. आणखी काही दिवस क्लासेस बंद राहिले तर आणखी खूप क्लासेस बंद होतील.

लाखो शिक्षक तरुण बेकार होतील. या आंदोलनात मागील पूर्ण आठवडा क्लासेस संचालकांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातील आमदार,खासदार,जिल्हापरिषद सदस्य,नगर सेवक आणि असंख्य राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना समजावून सांगितले. त्यांच्या कडून मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना क्लासेस संचालकांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून,त्यांना योग्य ते सहकार्य करावं,असे पत्र देण्याचे सांगितले. त्यानुसार महाराष्ट्रातून पत्र मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री यांना पाठविण्यात आली आहेत.आज आम्ही कोचिंग क्लासेस संचालक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांना एकाच वेळी आमच्या मागण्याचे पत्र आज दिले आहे .

शासनाने आमच्या मागण्यांचा गांभिर्याने विचार करावा व आम्हाला दुसऱ्या लॉक डाऊन ओपन मध्ये इतर व्यवसाय प्रमाणे क्लासेस घेण्यास सशर्त परवानगी द्यावी. अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरून आमचे आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल.निवेदन देताना सोशल डिस्टंसिग व इतर सर्व नियम पाळून संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सतिश देशमुख, प्रकाश पाटील,सचिन सरोदे,सुनिल सोनार, अनिल काकुलते,रवींद प्रजापती,विनायक चव्हाण,आनंद भोसले,मिलिंद मोरे, बबन चव्हाण, सुधेश अरगोडा,आनंदा जाधव, सय्यद अन्वर, भरत जगताप,पूर्वा माने,अंजली अरगोडा,विनोद हादवे,सुभाष मालकर,ज्ञानेश्वर मांडवे शैलेश सकपाळ,सागर चिंचकर, संतोष गोसावी व विभागीय प्रतिनिधी उपस्थित होते.

Web Title: Movement for various demands on behalf of the Coaching Classes Directors Association Maharashtra State

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे