मीरा - भाईंदर मनपा: महापौरपदासाठी भाजपकडून हसनाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 10:35 PM2020-02-24T22:35:15+5:302020-02-24T22:35:24+5:30

भाजपमध्ये मतभेद, सिंह, गेहलोत यांनी भरले अर्ज

Meera - Bhayandar Municipal Corporation: Hasanale by BJP for mayor | मीरा - भाईंदर मनपा: महापौरपदासाठी भाजपकडून हसनाळे

मीरा - भाईंदर मनपा: महापौरपदासाठी भाजपकडून हसनाळे

Next

मीरा रोड : मीरा भार्इंदर महापालिकेच्या महापौरपदासाठी भाजपकडून ज्येष्ठ नगरसेविका ज्योत्स्ना हसनाळे यांनी तर, शिवसेनेकडून अनंत शिर्के यांनी उमेदवारी अर्ज भरला. उपमहापौर पदावरुन भाजपमध्ये मतभेद असून भाजपचे हसमूख गेहलोत आणि मदन सिंह यांनी अर्ज भरले. काँगे्र्रसच्या मर्लिन डिसा यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. भाजप नगरसेवकांचा विरोध व वरिष्ठांनी नगरसेवकांची मते जाणून घेतल्याने माजी आ. नरेंद्र मेहतासमर्थक रुपाली मोदी यांचा महापौरपदासाठी तर ध्रुवकिशोर पाटील यांचा उपमहापौरपदासाठी पत्ता कापल्याने मेहतांना धक्का बसला आहे.

२६ फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर पदासाठी निवडणूक होत असून, पालिकेत भाजपचे ६१, शिवसेनेचे २२, तर काँग्रेस आघाडीचे १२ नगरसेवक आहेत. भाजपकडे स्पष्ट बहुमत असले तरी सेनेच्या अनिता पाटील आणि दिप्ती भट. तर काँग्रेसचे नरेश पाटील व अमजद शेख हे भाजपच्या गळाला लागल्याने महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. भाजपकडून अन्य काही नगरसेवकांनाही फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. अंतर्गत रोषामुळे फूट पडण्याची धास्ती असल्याने भाजप नगरसेवकांना गोव्याला, तर सेना नगरसेवकांना लोणावळ्याला नेण्यात आले.

भाजपकडे स्पष्ट बहुमत
भाजपकडे स्पष्ट बहुमत असून सेना व काँग्रेसचे प्रत्येकी दोन नगरसेवक त्यांच्यासोबत असल्याने त्यांचा महापौर, उपमहापौर सहज निवडून येऊ शकतो. उपमहापौरपद मदनसिंह यांना मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनादेखील चमत्कार घडवण्याची भाषा करत असून, त्यासाठी भाजपचे १८ नगरसेवक फोडण्याची आवश्यकता आहे.
शिवसेना व काँग्रेस महाविकास आघाडीने उमेदवारांचे एकत्र अर्ज भरले. सेनेचे अनंत शिर्के महापौर तर काँग्रेसच्या मर्लिन डिसा यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज भरला. यावेळी खा. राजन विचारे, आ. प्रताप सरनाईक, विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे आदी उपस्थित होते.

Web Title: Meera - Bhayandar Municipal Corporation: Hasanale by BJP for mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.